#विजेत्याना बक्षिसांचे वितरण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लोकमान्य संचालित रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर व श्री चौराशीदेवी संगीत कला मंच खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री.विठ्ठल नाद संगीत भजन स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
सत्यवर्त नाईक सेक्रटरी लोकमान्य एज्युकेशन सोसायटी बेळगाव उद्घाटनप्रसंगी खानापूरचे आमदार होते.
दीपप्रज्वलन प्रसाद विठ्ठलराव पाटील ग्राम पंचायत सदस्य गर्लगुंजी,सौ शरयू वसंतराव कदम प्राचार्या लोकमान्य संचालित रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर ,.निरंजन उदयसिंग सरदेसाई अध्यक्ष शिवस्वराज्य जनकल्याण फाउंडेशन खानापूर,.विलास कृ.बेळगावकर संस्थापक अध्यक्ष,.बाळाराम महादेव शेलार मा ता.पं.सदस्य, आय.आर.घाडी अध्यक्ष वकिल संघटना खानापूर यांच्या वतीने झाले.
# भजन स्पर्धा विद्यार्थी गट महिला गट व पुरुष गट अशा तीन विभागांत झाल्या.!

विद्यार्थी गटाचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यवर्त नाईक सेक्रेटरी लोकमान्य एज्युकेशन सोसायटी व प्राचार्या सौ शरयू वसंतराव कदम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. विद्यार्थी गटामध्ये प्रथम क्रमांक जांबोटी माध्यमिक विद्यालय जांबोटी, द्वितीय क्रमांक श्री चौराशी हार्मोनियम मंडळ खानापूर, तृतीय क्रमांक मराठा मंडळ हायस्कूल करंबळ चौथा क्रमांक मराठा मंडळ हायस्कूल खानापूर,पाचवा क्रमांक लोकमान्य वागळे महाविद्यालय खानापूर याना रोख रक्कम मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले
महिला गटात प्रथम क्रमांक श्री विठ्ठल रखुमाई महिला भजन मंडळ मणतुर्गे, द्वितीय क्रमांक हनुमान महिला भजन मंडळ मोदेकोप तृतीय क्रमांक दत्त महिला भजन मंडळ ओलमनी चौथा क्रमांक नागेशदेव महिला भजन मंडळ नागुर्डा पाचवा क्रमांक महिला भजन मंडळ विद्यानगर खानापूर सहावा क्रमांक माऊली भजन मंडळ मोदेकोप सातवा क्रमांक महिला भजन मंडळ दादोबा नगर खानापूर उत्तेजनार्थ रवळनाथ महिला भजन मंडळ खानापूर,चौराशीदेवी महिला भजन मंडळ खानापूर,कौदल,किरावळे माणीकवाडी याही महिला मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण खानापूर तालुक्याचे आमदारांच्या हस्ते तसेच आबासाहेब दळवी सरचिटणीस, बाळाराम म.शेलार, भरमाणी पाटील,भरत तोपीननकट्टी मलेशी इ.संपन्न झाले.
पुरुष गटातील प्रथम क्रमांक श्री शिवगणेश भजन मंडळ दारोळी द्वितीय क्रमांक श्रीराम भजन मंडळ जांबोटी पेठ, तृतीय क्रमांक दुर्गा भजन मंडळ बैलूर चौथा क्रमांक श्री बालशिवाजी संगीत भजन मंडळ मणतुर्गे,पाचवा क्रमांक श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ कुपटगिरी सहावा क्रमांक स्वयंभू श्री माऊली भजन मंडळ हब्बनहट्टी.सातवा क्रमांक भजन श्री माऊली भजन मंडळ जांबोटी पुरुष गट बक्षीस वितरण श्री आबासाहेब दळवी म.ए.समिती सरचिटणीस, एम.टी.कुंभार बि.एस.एन.एल.निवृत अधिकारी ,प्रल्हाद गुंडपीकर , महिपती गं. बेळगावकर, रामचंद्र पाटील यांच्या हस्ते झाले.
परिक्षण धर्माजी नंद्रणकर व ह.भ.प.शशीकांत गावडे यांनी केले. प्रास्ताविक एम.व्ही.चोर्लेकर व. सुत्रसंचलन प्रा.शंकर गावडा यांनी केले
