संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
अलिकडे शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत असुन बदल आत्मसात करण्यासाठी शिक्षकानी स्वताला अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज आहे.
परीक्षा होतच असतात, परीक्षेत केवळ उत्तर लिहीणे हे अंतिम नसुन विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न विचारण्याची वृत्ती वैज्ञानिक दृष्टीकोन, सर्जनशीलता व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे ही अत्यंत गरजेचे आहे.असे प्रतिपादन इस्त्रोचे निवृत्त समुह संचालक ,शास्त्रज्ञ विष्णूपंत मिसाळे यानी केले.
आयआयएसईआर पुणे , लोक मान्य मल्टीपर्पज को-आँप सोसायटी तसेच लोकमान्य एज्यूकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्या माने खानापूर लोकमान्य भवनात तालुक्यातील हाय स्कूलच्या विज्ञान गणित शिक्षकाच्या कार्यशाळेत उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ते म्हणाले कि ,विकसित देशाची ओळख केवळ आर्थिक प्रगतीवरून होत नाही.तर तेथील शिक्षण व्यवस्था किती प्रभावी व परिणाम कारक आहे.यावरही त्या देशाचा विकास आवलंबून असतो.
विद्यार्थ्याना केवळ पुस्तकातील ज्ञान न देता त्याना दैनंदिन जीवनाशी सबंध जोडुन देने आवश्यक असल्याचे त्यानी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपिठावर लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब,ज्ञान वर्धिनि प्रतिष्ठान अध्यक्ष पिटर डिसोझा,गजानन धामणेकर, बीईओ मंजुनाथ हत्ती, नितिन तिवाणे, प्रज्ञा पुजारी , भारत ठोबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यशाळेचे समन्वयक डाॅ.डी एन मिसाळे, प्राचार्य डाॅ.शिरीष केरूर, सत्यव्रत नाईक,संचालक प्रकाश चव्हाण, विवेक गिरी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक प्राचार्य डाॅ शिरीष केरूर यानी केले.तर उपस्थितांचे स्वागत डाँ.डी. एन मिसाळे यानी केले.
कार्यशाळेला तालु क्यातील माध्यमिक शाळेतील गणित व विज्ञान शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
