#खानापूर हिंदुसंघटना बैठकीत मागणी !
मोर्चा काढुन सरकारला निवेदन देणार !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हेब्बाळ (ता. खानापूर) येथील मोहन
केसरेकर व मनीषा केसरेकर हे दांपत्य उदरनिर्वाहसाठी कुपवाडा( सांगली) येथे वास्तव्यास होते.
केवळ कचरा टाकण्याच्या कारणावरून दि १५ आँगस्ट रोजी कुपवाड येथे दांपत्याची निघूर्ण हत्या करण्यात आली. त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. यानिषर्धात खानापूर तालुका सर्व हिंदु संघटना पदाधिकार्याच्या उपस्थित सार्वजनिक बांध काम खात्याच्या विश्रामधामात बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी बोलताना खानापूर तालुक्याचे आमदार म्हणाले कि, केसरेकर दांपत्य हे उदरनिर्वाहसाठी कुपवाड (सांगली) येथे स्थायीक होते.केवळ कचरा टाकल्याच्या कारणावरून आरोपी फरीद अब्दुल शेख याने मनीषा यांच्यावर हल्ला केल्याने जागीच मृत्यू झाला. तर पती मोहन याच्या वर ही जीवघेणा हल्ला केल्याने त्याचा ही मृत्यू झाला.
हे वाईट कृत्य करणार्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.यासाठी खानापूर तालुक्यातील सर्व हिंदु संघटनानी एकत्र येऊन उद्या गुरूवारी दि.२७ रोजी सकाळी १० वाजता खानापूर लक्ष्मीमंदिराच्या आवारातुन मोर्चा काढु, तेथून तहसील कार्यालयात येऊन सरकारला निवेदन सादर करू.
तसेच आई वडीलापासुन दुरावलेल्या मुलाना धीर दे ऊन त्याना सरकारकडुन आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करून केसरेकर कुटूंबाच्या पाठीशी उभे राहु. असे विचार मांडले.
यावेळी भाजपच्या पदाधिकारी, माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकारी, शिवप्रतिष्ठान संघटना पदाधिकारी,बजरंग दल व विश्व हिंदू परिषद पदाधिकारी ,कन्नड रक्षण वेदिकेचे पदाधिकारी आदीनी उद्या गुरूवारी दि.२७ रोजी होणार्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा.असे आवाहन केले.

