#म.मं.हाय्यर सेकंडरी व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त माध्यमाने !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील मराठा मंडळ हाय्यर सेकंडरी स्कूल व प्रजापती ब्रह्म कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने बुधवारी दि.१९ रोजी नशा मुक्ती दिन साजरी करण्यात आला.
यावेळी ब्रह्मकुमारी विद्यालयाचे बी. के पद्मा या उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आज विद्यार्थी अनेक प्रकारच्या नशेत गुंतलेले आहेत.मद्यपान करणे सिगारेट ओढणे ,तंबाखू खाणे, गुटखा खाणे, यांच्या आहारी गेलेले आहेत .त्यातच भरती म्हणून आज आणखीन एक नवीन नशा जन्माला आलेली आहे. तो म्हणजे मोबाईल मोबाईल मध्ये मुले इतके गुंतलेले आहेत की त्यातून बाहेर काढणे फार कठीण जात आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी मोबाईल सहित कोणत्याही प्रकारचे नशा न करता केवळ आपल्या संपूर्ण मन अभ्यासाकडे वळवावे. आपली व आपल्या कुटुंबाचे उन्नती कोणत्या माध्यमाने होईल त्याचे विचार करावे. असे सांगत असतानाच नशेतून बाहेर या असे आवाहन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक के.व्ही. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे नशा न करता आपला संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रित करावे.नवीन नवीन पुस्तके वाचावेत नवीन नवीन ज्ञान मिळवण्याचे प्रयत्न करावा. असे आव्हान केले.या संदर्भामध्ये शाळेचे जेष्ठ शिक्षक एस.एम.मुतगी, आरटी पत्री ,वाय एफ निलजकर, श्रीमती एस.बी.भातकांडे, व इतर शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाला जवळजवळ ६०० विद्यार्थी उपस्थित होते.

