#दहावी परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण घेऊन राज्यात प्रथम !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
झुंजवाड के.एन. ( ता.खानापूर) गावची कन्या व होली क्राँस काँन्व्हेन्ट बिडी हायस्कूलची विद्यार्थीनी कु दिव्या प्रदीप देसाई हिने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण मिळवुन राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला.
याबद्दल बेंगरूळ येथील लोक भवन ( ग्लास हाऊस) मध्ये कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचनद गेहलोत
मुख्यमंत्री. डी के शिवकुमार
स्पीकर. जी एस पाटील यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
कु.दिव्या प्रदीप देसाई ही झुंजवाड ( के.एन) (ता. खानापूर ) गावची कन्या असुन सध्या ती बेळगाव येथील गुरूदेव जांबगी सायन्स काॅलेजात शिक्षण घेत आहे.
तिच्या या बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
