“पत्नी मनिषा हिचा शनिवारी मृत्यू,तर पती मोहन यांचा आज मृत्यू”
खानापूर प्रतिनिधी
मुळचे हेब्बाळ ( ता. खानापूर )गावचे दांपत्य गवंडी कामा निमित्त कुपवाड़ा सांगली येथे वास्तव्यास असलेल्या दापंत्यावर शनिवारी १५ आँगस्ट रोजी भ्याड हल्ल्यात पत्नी मनीषा हिचा जागीच मृत्यू झाला.तर पती मोहन हा गंभीर जखमी झाला होता.त्यांच्यावर रूग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.मात्र उपचार दरम्यान आज मंगळवारी दि.१८ रोजी मोहन केसरेकर यांचा मृत्यू झाला.या घटनेने केसरेकर कुंटूबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हल्ल्याच्या घटनेने खानापूर तालुक्यात संताप!
१५ आँगस्ट रोजी कुपवाड़ा येथे केसरेकर दांपत्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला होता.या हल्ल्यात पत्नी मनीषा हिचा मृत्यू झाला.तर गंभीर जखमी झालेले पती मोहन केसरेकर त्यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र उपचार दरम्यान आज त्याचा ही मृत्यू झाला.त्यामुळे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.तर खानापूर तालुक्यात केसरेकर दांपत्याचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट पसरली आहे.
मुलांचे आईवडीलांचे छत्र हरपले!
वडील मोहन व आई मनिषा या दोघांचा मृत्यू झाल्याने मुलांचे आईवडीलांचे छत्र हरपले.आईवडील निघुन गेल्याने मुलांचे भविष्य आंधारकुट झाले आहे.त्याच्या भविष्याची काळजी, संगोपन कोण करणार यासाठी सरकारने कुंटूंबाला तातडीने आर्थिक मदत मुलांच्या पुढील भविष्यासाठी तसेच शिक्षणासाठी अवश्यक ती मदत करावी.अशी मागणी सर्व थरातुन होत आहे.
दोषीवर कठोर कारवाई होऊन फाशी व्हावी!
दांपत्यावरील झालेल्या हल्ल्यातील घटनेतील सत्य जानून आरोपीवर कठोर कारवाई होऊन त्याला फाशीची शिक्षा व्हावी.व पिडीत कुंटूंबाला न्याय मिळवून द्यावा.अशी मागणी सर्व थरातुन होत आहे.