#वाहतुकीची कोंडी, आपघाताच्या घटना!
#वाहनधारकाचा जीव धोक्यात!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील बेळगाव पणजी महामार्गावरील माडीगुंजी गावाजवळील सर्व्हीस रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.जागोजागी चिखलाचे साम्राज्य पसरल्याने . वाहनधारकाना तसेच दुचाकी स्वाराना या रस्त्यावरून ये जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. एवढेच नव्हेतर पायी चालत जाणे ही मुष्कील झाले आहे.
या सर्व्हिस रस्त्याच्या मध्येच ट्रक चिखलात आडकला आहे.,तर दुसर्या बाजुला टिप्पर पलटी होण्याच्या परिस्थितीत उभा आहे.अशी दैयनिय अवस्था माडीगुंजी सर्व्हिस रस्त्याची झाली आहे.
माडीगुंजी हे गाव उपतहसीलदार कार्यालय,रयत केंद्र ,कृषी केंद्र,सी आर सी सेंटर अशा विविध कार्यालयानी सजलेले या भागातील सर्वात जास्त लोक संख्या असलेले गाव असुन या गावाला वाहनाची तसेच प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते.
असे असताना माडीगुंजी गावच्या सर्व्हिस रस्त्यावर चिखलीचे साम्राज्य पसरल्याने या रस्त्यावरून ये जा करण्यार्या प्रवासी, शाळकरी विद्यार्थी तसेच नागरीकाना खूप त्रास सहन कराना लागत आहे.
सबंधीत सार्वजनिक बांध काम खात्याचे तसेच तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचे यारस्त्याच्या खड्ड्यांकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे माडीगुंजी ग्रामस्थानी न्याय कुणाकडे मागावा.असा प्रश्न गावकर्याना पडला आहे.
यारस्त्यातील चिखलामुळे अनेक दुचाकी स्वारांचा आपघात होऊन गंभीर जखमी झाले आहेत.तर दररोज एक, दोन वाहनांचा आपघात होतच आहे.
तेव्हा संबधीत खात्याच्या अधिकार्यानी चिखलाची पाहणी करून त्वरित संबधित कंत्राटदारावर कारवाई करावी. अन्यथा रस्त्यावर उतरूण रास्तारोको करण्याचा ईशारा माडीगुंजी गावचे सामाजिक कार्यकर्ता पंकज कुट्रे यानी दिला आहे .
.
