#माजी ग्रा.पं.सदस्य महांतेश पाटील यांचा पुढाकार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील बरगांव ग्राम पंचायत हद्दीतील गटारी तसेच सरकारी प्राथमिक मराठी शाळेसमोरील कचरा, तसेच गटारी ग्राम पंचायतीने त्वरित स्वच्छ करावे.अशा मागणीचे निवेदन माजी ग्राम पंचायत सदस्य महांतेश पाटील यां च्या नेतृत्वाखाली बरगांव ग्राम पंचायतीच्या पी डी ओ ना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, १५ आँगष्ट स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे. तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी गावात शाळेच्या आवारात स्वच्छता पाहिजे.यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी गाावतील गटारी, तसेच सरकारी प्राथमिक मराठी शाळे समोरील कचरा व गटारी स्वच्छ झाल्या पाहिजेत, अन्यथा खानापूर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा पंचायत सी ई ओ अधिकार्याकडे तक्रार करण्यात येईल, असे निवेदन बरगाव ग्राम पंचायत पीडीओ यां च्या अनुपस्थित क्लाँक यांच्याकडे देण्यात आले.
निवेदन देताना माजी ग्राम पंचायत सदस्य ,भाजप नेते महांतेश महादेव पाटील ,मंगेश पाटील, किरण पाटील,
तानाजी पाटील,रतुल धामणेकर,बी जी पाटील,रामू वागळेकर, सिध्दू दळवी,लक्ष्मण पाटील,विरूपाक्ष पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
