संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
यंदा निवृत्त झालेले भारतीय सैनिक,यंदाच्या दहावीच्या परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थी, १०० % निकाल लागलेल्या शाळांचा सत्कार, स्वातंत्र्य सैनिक,उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार १५ आँगष्ट स्वातंत्र्य दिनी करण्यात येणार,असे आमदार विठ्ठल हलगेकर यानी गुरूवारी दि.२९ रोजी तहसील कार्यालयात बोलविलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वतयारी बैठकीत सांगीतले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार दुंडाप्पा कोमार होते.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की, स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण असुन गौरवाचा दिवस आहे.तेव्हा सण प्राथमिक शाळापासुन महाविद्यालयापर्यत तसेच ग्रामपंचायत, शासकीय कार्यालय,विविध संघ संस्था आदी ठिकाणी सर्वानी मिळुन मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यासपिठावर माजी आमदार दिगंबर पाटील उपस्थित होते.
प्रारंभी तहसीलदार दुंडाप्पा कोमार यानी उपस्थिताचे स्वागत केले.
बैठकीत एस एन कम्मार मागील वृत्तांत वाचुन दाखविला.
यावेळी समाज सेवक एन सी तलवार यानी तहसीलकार्यालयात थोर पुरूषाच्या जयंती साजरी करताना देशभक्तांचे योगदान,व राष्ट्रीय मुल्ये समजावुन सांगण्यासाठी वक्त्यांच्या मार्गदर्शनाचे नियोजन करा.असे सुचित केले.
यावेळी चीफ आँफिसर संतोष कुरबेट यानी भुजल पातळी घटत असल्याने हायस्कूल विभागातुन रेन हार्वेस्टिंग विषयावर स्पर्धाचे आयोजन करून विजेत्याना बक्षिसे देण्यात येतील असे सांगीतले.
तर समाज सेवक जयंत तिनेईकर म्हणाले की स्वातंत्र्य दिन साजरा करताना फिश मार्केट जवळील रस्त्याच्या परिस्थीची दखल घेऊन तोडगा काढा.अशी सुचना केली.
समाज सेवक रवी काडगी यानी बसस्थानक,शाळा, महाविद्यालय परीसरातील व्यसनमुक्ती अभियानांतर्गत तंबाखू ,गुटखा,व इतर आम्ली पदार्थावर पोलिसानी बंदी आणावी.शहरातील मुख्य रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगवर कारवाई करून पोलिसानी शिस्त आणावी.अशी सुचना केली.यावेळी उपस्थित मान्यवरानी अनेक सुचना मांडल्या.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील यानी आपले विचार मांडताना म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी राष्ट्रीय पुरूषानी बलिदान दिले.त्यामुळे आज आम्हाला स्वातंत्र मिळाले, हे स्वातंत्र्य जतन करण्याची जबाबदारी आम्हा तुम्हा सर्वाची आहे.असे सांगीतले.
यावेळी बैठकीला कृषी अधिकारी डी.व्ही.चव्हाण,पशु अधिकारी डाॅ.मनोहर दादमी, प्रभारी बीईओ मंजुनाथ हत्ती,वइतर अधिकारी उपस्थित होते.


