
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मन्सापूर ( ता.खानापूर) गावातील सदाशिव कांबळे यांच्याकडुन खानापूर भू नोंदणी कार्यालयातील सर्व्हेअर विनोद संबान्नी यानी पी टी शीट तयार करून देण्यासाठी ४,५०० रूपयाची लाच मागीतली होती.याबाबत सदाशिव कांबळे यानी बेळगाव लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती .
याची दखल घेऊन तक्रारीनंतर लोकायुक्त एस पी हणुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली डी एस पी भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने खानापूर तालुका भू सर्वेक्षण विभाग कार्यालयात चार हजार पाचशेची रूपयाची लाच स्विकारणार्या सर्व्हेअर विनोद सांबानीला रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले आहे.
मंगळवारी दि.३ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सदर सर्व्होअरने खानापूरातील आपल्या घराकडे पैसे देण्यासाठी बोलविले होते. त्याच ठिकाणी सापळा रचुन लोकायुक्त पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
यावेळी लोकायुक्त अधिकारी संगमेश होसमनी ,रविकुमार धर्मट्टी,तसेच लोकायुक्त पोलिस हजर होते.
तालुक्यातुन अनेक अधिकारी लोकायुक्त जाळयात!
खानापूर तालुक्यातील अधिकारी लाच मागण्यात इतके माजले आहेत .त्यामुळेच खानापूर तालुक्यातील अनेक अधिकारा लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडत आहेत.
या आदी तालुक्यातील जिल्हा पंचायतीचे ए ई ई श्री बन्नूर यानी ग्राम पंचयात सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर याच्याकडे लाच मागीतली होती.त्याना ही लोकायुक्तांच्या जाळ्यात पकडुन दिले ही घटना ताजी असतानाच आज सर्व्हेअर विनोद सांबानी हे लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडले आहे.
लोकप्रतिनिधी तालुक्याच्या विकासा पेक्षा तहसील कार्यालय,जिल्हा पंचायत कार्यालयसह इतर कार्यालयात होणारी लाच थांबवावी.अशी मागणी विनायक मुतगेकर यानी केली आहे.