संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) येथील सन १९८०-८१ सालच्या सातवीच्या मा जी विद्याथ्याकडुन गर्लगुंजी सरकारी मराठी उच्च प्राथमिक मुलांच्या शाळेला दोन बेंच भेटी दाखल देण्यात आले.
शुक्र वा री दि.२४ रोजी गर्लगुंजी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत आयोजित कार्यक्रमात बेंचीस देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष संतोष पाटील होत.यावेळी माजी विद्यार्थी सुरेश भांतकांडे,संतोष पाटील,सुब्राव पाटील, पी डी कुंभार, एस एल भक्तुरी, परशराम पाटील, राजेंद्र हंप्पण्णावर ,पी आर कुंभार आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.नंदा देसाई यानी केले.तर स्वागत सौ एस जी कुंभार यानी केले.
यावेळी सन १९८०-८१ सालच्या माजी विद्यार्थ्याकडुन दोन बेंचीच शाळेला सुपूर्त केले.यावेळी माजी विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सौ.के.एन.धामणेकर यानी मानले.

