संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
उचवडे (ता.खानापूर ) गावाला गेल्या पंधरा वर्षापासुन बस गेलीच नाही.त्यामुळे गावच्या विद्यार्थ्याना ,नागरीकाना तसेच प्रवाशाना बससेवेविना अनेक समस्याना तोंड द्यावे लागले.
तेव्हा या गावाला पुन्हा बस सेवा चालू व्हावी व गावकऱ्यांना सोयीचे व्हावे त्यासाठी गुरूवारी दि.१८ रोजी भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद कोचेरी
यांनी बेळगाव केएसआरटीसी डेपो मॅनेजरची भेट घेऊन बेळगाव उचवडे अशी बस सेवा पुन्हा चालू करावी. अशी विनंती करून निवेदन दिले. यावेळी डेपो मॅनेजरने बस पुन्हा चालू करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजप.नेते माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे, भाजपा माजी जनरल सेक्रेटरी मारुती पाटील, बबन आलोळकर व इतर गावकरी मंडळी उपस्थित होती.
