संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी.
खानापूर शहरातील श्रीस्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटी संचालित श्री स्वामी विवेकानंद कला,वाणिज्य,व विज्ञान पी यु महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या स्वागतासाठी “फ्रेशर्स डे” कार्यक्रमाचे आयोजन उद्यान शुक्रवारी दि.१९ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्ंस्थेचे चेअरमन अँड.चेतन मणेरीकर उपस्थित राहतील.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.प्रणव पित्रे, जी एस एस काॅलेज बेळगाव हे उपस्थित राहतील.
तर विशेष उपस्थिती संस्थेचे सचिव सुहास कुलकर्णी, प्राचार्य विनोद मराठे,उपस्थित राहणार आहेत.तर संस्थेचे संचालक मंडळ,प्राध्यापक,कर्मचारीउपस्थित राहणार आहेत.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालय संघाच्या अध्यक्षा सौ उज्वला बाचोळकर,निवृत्त प्राचार्य व मार्गदर्शक प्रा.एस एस पाटील,
महाविद्यालयाचे प्राचार्य पी.के.चापगावकर यानी केले आहे.