#खानापूर म .ए समितीचे बीईओना निवेदन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा निव्वळ मराठी भाषिक
तालुका असुन तालुक्यात मराठी माध्यमच्या शांळाची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.असे असताना अलिकडेच काही शासकीय निर्णय व प्रशासकीय हालचालीमुळे मराठी शांळाचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची गंभीर बाब निर्देशनास आली आहे.विद्यार्थ्याची संख्या कमी असल्याचे कारण पुढे करून लोंढा (ता.खानापूर) परीसरातील गवळीवाड्यावरील मराठी शांळांचे कान्नडीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.,मराठी शाऴामधील शिक्षकांच्या बदल्या करून त्या शाळातुन कन्नड माध्यमचे शिक्षण सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.हा प्रकार मराठी भाषींकाच्या हक्कावर गद्दा आणणारा असुन अत्यंत निषेर्धात आहे.
तर कर्नाटक पब्लिक स्कूल सुरू करण्याच्या नावा खाली गु्ंजी येथील मराठी शाळेचे अस्तित्व संपूष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.तसेच खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील मराठी मुलांची व मुलांची स्वतंत्र शाळा एकत्रीत करण्याच्या हालचाली सुरू आहेत.यामुळे मराठी भाषिकांतुन कमालीची नाराजी पसरली आहे.
यामागे खानापूर बीईओ कार्यालयातुन प्रोहोत्सान मिळत आहे.अशी समज मराठी भाषिकातुन पसरली आहे.मराठी शाळांचे अस्तित्व आबाधित ठेवणे ,विद्यार्थ्याना मराठी भाषातुन शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे,भाषिक अल्पसंख्याकांच्या घटनाच्या हक्काचे संरक्षण करणे हे सरकारची जबाबदारी आहे.असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मागण्या मान्य करण्याचे म्हटले आहे.
लोंढा परीसरातील मराठी शाळाचे कानडीकरण करण्याचे थांबवा.
मराठी माध्यमातील शिक्षकाच्या अन्याय कारक बदल्या रद्द करून सबंधित शाळामध्ये आवश्यक शिक्षकांची नियुक्ति करावी.गुंजी मराठी शाळेचे अस्तीत्व कायम राखून विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील मराठी मुलां,मुलीची शाळा एकत्रीत करण्याचा घाट मारे घ्यावा.
मराठी भाषिक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हक्कावर परिणाम करणारे सर्व निर्णय स्थगित करावे.अशा मागण्या केल्या आहेत.
निवेदन देताना माजी आमदार दिगंबर पाटील, अध्यक्ष गोपाळ देसाई,सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्यदर्शी मुरलीधर पाटील नेते दिपक देसाई, प्रकाश चव्हाण, विलास बेळगावकर,धनंजय पाटील, सुनिल पाटील ,अजित पाटील,राजाराम देसाई,आर आर कुलम,डी एम भोसले ,खांबले आदी समितीचे नेते मंडळी उपस्थित होती.
