
#चीफ आँफिसरसह नगराध्यक्षा,नगरसेविकांची भेट!
संदेश क्रांंती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
गेल्या अनेक वर्षापासुन खानापूर शहरात इंदिरा कॅटीन व्हावे.अशी शहरवासीयातुन मागणी होत होती.
शेवटी सन २०२५ साली खानापूर शहरवाशी यांचे इंदिरा कॅटीनचे स्वप्न पूर्णत्वाला आले.याबद्दल खानापूर शहरवासीयातुन समाधानाचे वातावरण पसरले आहे.
खानापूर सरकारी दवाखानाच्या आवारात इंदिरा कॅटीनची उभारणी होत आहे.
सध्या इंदिरा कॅटीनच्या इमारतीसह सर्व सोयीनी युक्त कॅटीनची तयारी सुरू आहे.
कँटीनला लागणारी सगळी यंत्रे तसेच साहित्य तयार आहे.अधुनिक पध्दतीने इंदिर कॅटीन तयार होत आहे.
या इंदिरा कॅटीन मधुन ५ रूपया मध्ये नाष्टा तसेच १० रूपयामध्ये जेेवन देण्यात येणार आहे.या इंदिरा कॅटिन मध्ये स्वच्छतेला अधिक प्राधान्य देणार असुन ठराविक वेळेतच नाष्टा व ठराविक वेळेतच जेवन उपलब्ध होणार अशी माहिती खानापूर नगरपंचायतीचे चीफ आँफिसर संतोष कुरबेट यानी बोलताना माहिती दिली.
यावेळी नगराध्याक्ष सौ .मिनाक्षी बैलुरकर,सौ .राजश्री तोपिनकट्टी,सौ.लक्ष्मी अंकलगी व फातिमा बेपारी, सुपरवाईजर अधिकारी प्रेमानंद नाईक आदी उपस्थित होते.