#अनेक वर्षापासुन मल प्रभा क्रिडांगणाचा विकासच नाही!
#खेळांडुची गैरसोय!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रिडांगण हे गेल्या कित्येक वर्षापासुन विकासापासुन वंचित आहे.
याकडे लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष झाल्याने खेळाडुची गैरसोय होत आहे.
मलप्रभा क्रिडांगण हे कोणतीच सोय नसलेले क्रिडांगण!
खानापूर तालु क्या च्या ठिकाणी खेळांडुच्या खेऴांची सोय व्हावी.या उद्देशाने माजी आमदार कै.,प्रल्हाद रेमाणी यानी क्रिडांगणाची लाखो रूपये खर्च करून उभारणी केली.आपल्या काळात क्रिडांगण व्हावे.हे स्वप्न साकारले.परंतु त्यानंतरच्या लोकप्रतिनिधी याकडे विकासाच्या दृष्टिको णातुन ढुंकून ही पाहिले नाही.त्यामुळेच आज मलप्रभा क्रिडांगणाची ही दुरावस्था झाली आहे.
मलप्रभा क्रिडांगणावरील गैरसोयी!
सरंक्षण भिंत!
मलप्रभा क्रिडांगणा्च्या सभोवार आजुन ही संरक्षण भिंत नाही.त्यामुळे जनावरे ही क्रिडांगणात फिरत असतात.
क्रिडांगणात पाण्याची सोय नाही,शौचालय नाही.
मलप्रभा क्रिडागणांत खेळांडुसाठी पाण्याची अद्याप कोणतीच सोय नाही.त्यामुळे खेळांडुना पाण्यासाठी धडपड करावी लागते. हा मोठा प्रश्न खेळाडुना भेडसावित आहे.
क्रिडांगणाच्या आवारात खेळाडुसाठी शौचालय ,मुतारी नाही.
मलप्रभा क्रिडांगणावर कोणत्याच खेळाची मार्किंग केली नाही.
मलप्रभा क्रिडांगणावर आज तागायत कोणत्याच खेळाचे मार्किंग केले नाही.धावपट्याचे ही मार्किंग केले गेले नाही.त्यामुळे या मला प्रभा क्रिडांगणावर खो खो,कबड्डी, व्हाॅलीबॅाल, थ्रोबाॅल ,धावणे या सारखे खेळ होत नाही.
केवळ क्रिकेट खेळाला प्राधान्य!
मलप्रभा क्रिडांगणावर आज तागायत क्रिकेट खेला व्यतिरिक्त कोणतेच खेळ खेळले जात नाही.ते ही खासगी स्पोर्ट क्लबच्यावतीने क्रिकेट स्पर्धाचे आयोजन केले जाते.
लाईटाची सोय नाही.
रात्रीच्यावेळी मलप्रभा क्रिडांगण म्हणजे मद्यपीचा अड्डा!
खानापूर शहरातील मलप्रभा क्रिडांगण म्हणजे रात्रीच्यावेळी पद्यपीचा अड्डा बन ला आहे.
काळोख पडला म्हणजे आंधाराचा फायद्या घेत मद्यपी रात्रीच्यावेळी मलप्रभा क्रिडांगणावर दारू पिण्यासाठी येत असतात.त्यामुळे प्लॅस्टीक पिशव्या,ग्लास, तसेच बाटल्या तशाच क्रिडांगणावर पडलेल्या असतात.याचा त्रास पहाटेच्यावेळी मार्मिक वाकसाठी आलेल्या नागरीकाना त्रास होतो.
तेव्हा खानापूर च्या लोकप्रतिनिधीनी मलप्रभा क्रिडांगणाच्या विकासासाठी लक्ष द्यावे. अशी मागणी खेळांडु तसेच क्रिडाप्रेमीतुन होत आहे.
