#एकूण ३६ वर्षे सेवा !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
भंडरगाळी ( ता.खानापूर ) येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेचे कन्नड़ शिक्षक विठ्ठल कल्लापा चलवादी हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतुन ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले.
या निमित्त रविवारी दि. ७ जुन रोजी सकाळी ११ वाजता सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
विठ्ठल कल्लापा पाटील यांचा जन्म पारिश्वाड (ता.खानापूर) ये थे झाला.
नोकरीच्या सुरूवात सन १९९० मध्ये गदग जिल्ह्यातील माड्डवी गावात झाली.या गावात ५ वर्षे सेवा बजावली.
तेथून १९९५ साली भंडरगाळी (ता.खानापूर) येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेत कन्नड शिक्षक म्हणून बदली झाली.
याशाळेत गेली ३१ वर्षे कन्नड शिक्षक म्हणून सेवा बजावली. कर्तव्यदक्ष व विद्यार्थी प्रिय म्हणून कन्नड़ शिक्षक विठ्ठल चलवादी हे परिचयाचे होते.
त्याच्या सेवानिवृत्ती नंतर चे आयुष्य सुखासमाधानाचे जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थणा!
