#जुन्याआठवणीना उजाळा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर) गावचे सुपूत्र व भंडरगाळी सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक शिवाजी दत्ताजी पाटील यांची नुकताच झालेल्या बढती प्रक्रियेमध्ये तोपिनकट्टी ( ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथ.मराठी शाळेच्या मुख्याध्यापक पदी बढती झाली.
या निमित्त गर्लगुंजी येथील ज्योतिराव फुले विद्यालयातील सन १९८३-८४ सालचे इयत्ता १० वीचे वर्गमित्र यांच्यावतीने नुकताच शिवाजी दत्ताजी पाटील यांचा सपत्नीक सत्कार सोहळा त्यांच्या निवास
स्थानी पार पडला.
प्रारंभी वर्ग मित्र सुरेश भांतकांडे यानी प्रास्ताविक करून उपस्थित वर्ग मित्राचे स्वागत केले.
यावेळी नूतन मुख्याध्यापक शिवाजी दत्ताजी पाटील यांचा सपत्नीक शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ व पेढे भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन मुख्याध्यापक शिवाजी दत्ताजी पाटील म्हणाले की, मला मुख्याध्यापक पदी बढती मिळाली.याचा आनंद माझ्यापेक्षा माझ्या इयत्ता १० वीच्या वर्ग मित्राना झाला.याचा मला अभिमान वाटला.वर्ग मित्राची मान उंचावले असे काम माझ्या हातुन होईल .
यासाठी मी सतत प्रामाणिकपणे प्रयत्न करेण.आज माझ्या घरी येऊन माझा व माझ्या पत्नीचा सत्कार केला.या बद्दल मी तुमचा सदैव ऋणी आहे.
यावेळी वर्ग मित्रानी पहिली पासुन दहावी वर्गापर्यतच्या वर्गातील जुन्या आठवणीना उजाळा दिला. त्यामुळे वर्गमित्र उत्साहित झाले.
यावेळी वर्ग मित्र भीमराव कोलेकर यानी आभार मानले.
