संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सा ला बाद प्रमाणे यंदा ही खानापूर कुस्तीगीर संघटनेच्या वतीने रविवारी दि.२४ मे रोजी दुपारी ३ वाजता खानापूर येथील जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रिडांगणावर अंतरराष्ट्रीय कुस्तीचे भव्य मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा कुस्तीप्रेमीनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन खानापूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हणमंत गुरव (गणेबैल) यानी बुधवारी दि.२० मे रोजी खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलविलेल्या पत्रकार परिषेदत बोलताना माहिती दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, यंदा एकूण ६० कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम क्रमांकाची कुस्ती अंतरराष्ट्रीय पैलवान मिलता इरान विरूध्द हिंदकेसरी पै.पुष्पेंदर हरियाना, दुसर्या क्रमांकाचीकुस्ती अंतरराष्ट्रीय पै.जलाल रशिया विरूद्ध महाराष्ट्र केसरी, यु नि टेड वर्ल्ड चैम्पियन पै. पृथ्वीराज पाटील(कोल्हापुर),तीसर्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पै.विक्रम घोरपडे विरूद्ध पै.हेतराम ठाकुर मथुरा,चौथ्या क्रमांकाची दसरा कंठीरव पै.कामेश पाटील ( कंग्राळी), पाचव्या क्रमांकाची कुस्ती सिल्वर मेडल पै.गौतम शिंदे विरूद्ध दर्गा तालीम पै.शिवा दड्डी यांच्या बरोबर होणार असुन एकूण ६० कुस्त्या होणार आहेत.
यामध्ये मेंढा कुस्ती पै.प्रथमेश हट्टीकर विरूध्द पै.पृथ्वीराज खरात यांच्यात होणार आहे.तर महिला कुस्ती पै.भक्ती मोदेकोप विरूध्द पै.शितल सुतार खादरवाडी, तसेच पै.तनुजा गुरव पै.शिवानी वड्डेबैल यांच्यात होणार आहे.
आखाडा समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर असुन त्यांच्याच हल्के आखाड्याचे उदघाटन होणार आहे.
आखाडा पुजन माजी आमदार अरविंद पाटील व उद्योजक रमेश जेडनाईक यांच्याहस्ते होणार आहे.
हनुमान फोटो पुजन उद्योजक भूषण काकतकर यांच्याहस्ते तर शिवाजी महाराज फोटो पुजन उद्योजक कृष्णा बिंदले यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवराच्याहस्ते दीप प्रज्वलन होणार आहे.अशी माहिती दिली.
यावेळी माजी अध्यक्ष, संचालक यशवंत अल्लोळकर, लक्ष्मण बामणे, उपाध्यक्ष रूद्रापा हंडोरी,कार्याध्यक्ष राजाराम गुरव,खजीनदार लक्ष्मण झांजरे,सेक्रेटरी सदानंद होसुरकर, उपखजिनदार पांडुरंग पाटील,संचालक अर्जुन जांबोटी,जयवंत खानापूरकर,लक्ष्मण पाटील,प्रकाश मजगावी,नागाप्पा पाटील,अमोल बेळगावकर,अर्जुन देसाई,भाऊराव पाटील,मोहन निलजकर,कल्लापा पाटील तसेच कुस्तीगीर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार माजी अध्यक्ष लक्ष्मण बामणे यानी मानले.
