#भाविकानी घेतला महाप्रसादाचा लाभ !
#शुक्रवार पर्यत यात्रोत्सव!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) गावचे ग्राम दैवत श्रीमाऊली देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे यंदा मंगळवारी दि.२८ एप्रिल पासुन प्रारंभ झाला. ही यात्रा शुक्रवारी दि.१ मे पर्यत चालणार आहे.
यात्रेला मंगळवारी दि.२८ रोजी सकाळी गावातील विविध देवदेवतांची विधिवत पुजा होऊन दुपारी ३ वाजता गावातुन देवीची पालखी व मुखवटे माऊली मंदिराकडे वाद्याच्या नादात प्रस्थान होऊन माऊली मंदिरात देवीला गार्हाणे घालुन सायंकाळी यात्रोत्सवाला प्रारंभ झाला.
आज यात्रेचा मुख्य दिवस!
आज बुधवारी दि.२९ रोजी पहाटे सुवासिनीसह आरतीचे प्रस्थान माऊली मंदिराकडे झाले.त्यानंतर इंगळ्याना प्रारंभ झाला.त्यानंतर महाप्रसादाला सुरूवात झाली.
आज रात्री गावात मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. उद्या गुरूवारी दि.३० रोजी रात्री यात्रेनिमित्त गावात “रक्त झालं वैरी हा तीन अंकी नाट्यप्रयोग माऊली नाट्य मंडळ सादर करणार आहे.
शुक्रवारी दि.१ मे रोजी यात्रेचा शेवटचा दिवस यावेळी सायंकाळी ५ वाजता माऊली मंदीरात आरती होऊन पालखी व देवीच्या मुखवट्यांचे गावकडे प्रस्थान होईल.
