संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कणकुंबी ( ता.खानापूर ) येथील विश्व भारत सेवा समिती संचलित श्री माऊली विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८ टक्के लागला आहे.परीक्षेला एकूण ४५ विद्यार्थी बसले होते.फक्त एक विद्यार्थीनी नापास झाली.शुभम सुरेश गावडे यांने ५८५(९३.६%) टक्के गुण घेऊन हायस्कूल मध्ये प्रथम, रोहिणी परशराम कोळेकर हिने ५७०(९१.२%) गुण घेऊन द्वितीय तर भक्ती भिकाजी गावडे हिने ५६८(९०.८८%) गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे.यापैकी वरील शुभम,रोहिणी व भक्ती या तिन्ही विद्यार्थ्यांनी तृतीय भाषा इंग्रजी विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण घेतलेले आहेत.विशेष श्रेणीत ८ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत २५, द्वितीय श्रेणीत ९ तर तृतीय श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक एस जी चिगुळकर व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.
