संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराचा विस्तार वाढला.अनेक उपनगरे वाढली.मात्र गेल्या अनेक वर्षापासुन खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यमचे हायस्कूल नाही.खासगी संस्था गरीब विद्यार्थ्याचे जादा फिसाठी लचके तोडता आहेत.मागासवर्गीस विद्यार्थ्यीना कोणत्याच सरकारच्या योजनाचा लाभ मिळून देत नाही.भरमसाठ फी ची मागणी करतात.हे कुठ तरी थांबल पाहिजे.यासाठी यावर. एकच पर्याय म्हणजे खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यमचे हायस्कूल होणे गरजेचे आहे.
तेव्हा आमदार ,बीईओ यानी शिक्षण खात्याकडे प्रयत्न करून खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यम साठी हायस्कूलची सुरूवात कराल. अशी मागणी खानापूर शहरातील नागरूकातुन होत आहे.
बी ई ओ.पी.रामाप्पा म्हणतात खानापूर शहराची तसेच शहारजवळील खेड्याची परिस्थिती पाहता खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यम हायस्कूल व्हावे.ही गरजेची बाब आहे.हे माझ्या लक्षात आले आहे.
तेव्हा मी बी ई ओ म्हणून असे पर्यत माझा प्रयत्न राहिल.
खानापूरात आज पर्यत मराठी भाषेचा आमदार , मात्र सरकारी मराठी माध्यम हायस्कूल नाही.!
खरे पाहता खानापूर तालुका त्याचबरोबर खानापूर शहर हे ८० टक्के जनता ही मराठी भाषिक आहे.तर केवळ २० टक्के जनता कन्नड भाषिक आहे.
त्यामुळे खानापूर तालुक्याचा आमदार निव्वळ मराठी भाषेचा आमदार झाला आहे.
मात्र मराठी भाषिक आमदाराना खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यम हायस्कूल व्हावे.याची बुध्दीच नव्हती. आणि आज ही नाही आहे.म्हणून खानापूर शहरात केवळ कन्नड माध्यमचे सरकारी कन्नड हायस्कूल गेल्या कित्येक वर्षापासुन चालु आहे.
याची जानीव केवळ बी ई ओ पी रामाप्पा याना असल्याची दिसुन आली.
मात्र आमदार झालेल्याना आज तागायत केवळ मराठी भाषिकांची मते पाहिजे होती. त्याना खानापूर शहरात एखादे सरकारी मराठी माध्यमचे हायस्कूल व्हावे.असे कधीच वाटले नाही.त्यामुळे गेली कित्येक वर्षे खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यम हाय स्कूल नसतानाच गेली.यात अनेक मराठी भाषेच्या विद्यार्थ्याचे आर्थिक नुकसान तसेच शैक्षणिक नुकसान झाले आहे.
तेव्हा आता तरी मराठी आमदारानी सरकारी मराठी माध्यम हायस्कूल व्हावे.यासाठी प्रयत्न करावे.अशी मागणी खानापूर शहरवासीयातुन होताना दिसत आहे.

