#गेल्या कित्येक वर्षापासुन रस्त्याकडे दुर्लक्ष!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
नेहमीच वाहनाची वर्दळ असणारा हलगा नागरगाळी रस्ता गेल्या कित्येक वर्षापासुन दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असुन अद्याप या रस्त्याच्या दुरूस्तीकडे कोणीही गांभिर्याने लक्षच दिले नाही.त्यामुळे गेली अनेक वर्षे या रस्त्याची दयनीय आवस्था झाली आहे.
रस्त्याच्या दुरावस्थामुळे अनेकांचे बळी!
हलगा ते नागरगाळी रस्त्याची इतकी दयनिय आवस्था झाली आहे.कि, यारस्त्यावरून ये जा करणार्या दुचाकी वाहन धारकाना आपले जीव गमवावे लागले आहेत.अनेक जन बळी गेलेत.
तर एक दुचाकी वाहनधारक हा माजी आमदाराचा ड्राॅव्हर होता.तरी सुध्दा शासनाने या रस्त्याच्या दुरूस्तीकडे कानाडोळा केला आहे.जर रस्त्याच्या दुरूस्तीकडे आजुनही दुर्लक्ष केले तर आजुन किती जनाचे बळी घेणार असा प्रश्न प्रवाशी वहानधारकातुन तसेच याभागातील नागरीकातुन विचारला जात आहे.
रस्त्याच्या दुरूस्तीसाठी अनेक वेळा रास्ता रोको, मार्चा,निवेदन, !
गेल्या कित्येक वर्षापासुन या रस्त्याची दुरूस्ती झाली नाही.म्हणून हलशी, हलगा, मेरडा, नागरगाळी व इतर गावच्या नागरीकांनी कित्येकवेळा रास्ता रोको,मोर्चा, निवेदन देऊन आज तागायत रस्त्याच्या दुरूस्तीकडे प्रशासनाने लक्ष दिलेच नाही.
# येत्या २७ एप्रिलची डेट लाईन,अन्यथा संबधीत काॅट्रक्टर,खात्याच्या अधिकार्यावर एफआरआय दाखल करू!
रणजीत पाटील, हलगा
हलगा नागरगाळी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी वारंवार रास्ता रोको,मोर्चा, निवेदन करून रस्ता दुरूस्तीला सुरूवात केली. मात्र काॅट्रक्टरने, संबधीत खात्याच्या अधिकार्यानी, हलगर्जी केल्याने रस्ता दुरूस्ती ते काम अर्धवट केले.त्यामुळे याभागातील प्रवाशाना, वाहन चालकाना तसेच प्रवाशाना आगीतुन फोफाट्यात अशी अवस्था झाली आहे.तेव्हा रस्त्याची दुरूस्ती येत्या सोमवारी दि.२७ एप्रिल पर्यत रस्त्याच्या दुरूस्तीला सुरूवात झाली नाही तर संबधित काॅट्रक्टर, संबधित खात्याच्या अधिकार्यावर एफआरआय दाखल करू.याची झळ लोकप्रतिनिधीना ही पोहचेल असा ईशारा हलगा ग्राम पंचायतीचे माजी सदस्य रणजित पाटील यानी दिला आहे.

