“शहरवासीयातुन घाबराट! आरएफओ श्रीकांत पाटील यांच्या प्रयत्नाने हत्ती जंगलात परतला!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या जंगलभागात हत्तीचा धुमाकुळ हा काही नवीन नाही.मात्र शनिवारी दि.१८ रोजी सकाळी चक्क हत्ती खानापूर शहरालगतच्या शिवाजी नगरात दत्त झाल्याने शहरवासीयातुन भितीचे वातावरण पसरले.
खानापूर शहरालगतच्या वस्तीकडे हत्ती!
वर्षभर तालु क्या च्या जंगलभागात हत्तीचा धुमाकुळ सुरू आहे.त्यामुळे शिवारातील ऊस,केळी,चिकू, व इतर पिकांचे आतोनात नुकसान सुरूच आहे. हत्ती पासुन पिकांचे सरंक्षण करण्यात शेतकरी हतबल झाला.
मात्र लोकप्रतिनीधी व वनखाते हत्तीचा कायमचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले आहेत.
त्यामुळे शेवटी हत्तीनी खानापूर शहरालगतच्या लोक वस्तीपर्यत मजल मारली.
लागलीच शहरालगतच्या नागरीकांनी वन खात्याला माहिती दिली.
माहिती मिळताच वनखात्याचे आर एफ ओ श्रीकांत पाटील यानी वनकर्मचार्यासह नागरीकांच्या मदतीने हत्तीला जंगलात हुसकावून लावण्यास यशस्वी झाले.
हत्ती जंगलातुन खानापूर हेम्माडगा मार्गावरील शेडेगाळी सरकारी हाँल्टिकल्चर खात्याच्या हद्दीत गेल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर पुन्हा हत्तीला जंगलात पिटाळुन लावण्यात आले.
वनखात्याचे आर एफ ओ श्रीकांत पाटील व. वन खात्याच्या कर्मचारी यांच्या प्रयत्नाने हत्ती शहरापासुन जंगलाकडे गेला.मात्र हत्तीकडुन कोणते नुकसान अथवा जीवित हानी झाली नाही. परंतु खानापूर शहरासह तालुक्यातील नागरीकानी सतर्क राहुन वन खात्याला सहकार्य करण्याचे आवाहन आरएफओ श्रीकांत पाटील यानी केले.
