आयआयएसईआर पुणे,लोकमान्य एज्यूकेशन सोसायटी व मल्टीपर्पज को-आँप.सोसायटी यांच्यावतीने!
‘शुक्रवार दि.२८ व शनिवार दि.२९’
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील हायस्कूल गणित व विज्ञान शिक्षकासाठी दोन दिवसशीय कार्यशाळेचे आयोजन इंडियन इन्स्टीट्यूट आँफ सायन्स एज्यूकेशन अँड रिसर्च पुणे व लोकमान्य एज्यूकेशन सोसायटी, लोकमान्य मल्टीपर्पज को.आँप सोसायटी यांच्या वतीने व लोकमान्य संस्थेचे संस्थापक डाॅ किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या शुक्रवार दि २८ व शनिवार दि २९ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
,खानापूर तालुक्यातील हायस्कूलच्या गणित व विज्ञान शिक्षकासाठी ही कार्यशाळा शुक्रवार व शनिवार सकाळी १० ते १२ यावेळेत खानापूर व्ही वाय चव्हाण पाॅलिटेक्निक काॅलेज लोकमान्य भवनात होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन शुक्रवारी दि २८ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व तरूण भारतचे अँडव्हायजर डाॅ.किरण ठाकुर उपस्थित राहतील.
उदघाटन कार्यक्रमाला भारतीय अंतराळ व सेवानिवृत्त अभियंते, इस्रोचे ग्रुप डायरेक्टर विष्णूपंत एन.मिसाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तर अतिथी म्हणून ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक पिटर डिसोझा, बीईओ एम जी हत्ती,नितीन तिवाणे,रिसोर्स पर्सन प्रज्ञा पुजारी,भरत ठोंबरे आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला व्हा.चेअरमन पंढरी परब व संचालक , पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.
याकार्यशाळेला तालुक्यातील ७१ हाय स्कूल मधील गणित व विज्ञान या दोन विषयाचे १४२ शिक्षक उपस्थित राहणार आहेत.
प्रशिक्षानंतर ३० ते ४० शिक्षकांची उच्चस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.

