
मुख्याध्यापक समरसिंह पाटील
#खैरवाड मराठी शाळेच्या १९९७-९८ सालच्या इ.७ वीच्या विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
नुसतेच शिकू नका! सुसंस्कृत व्हा. त्यामुळे तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. शिक्षणाबरोबर सुसंस्कृत ही आजची नितात गरज आहे.सुसंस्कृत असाल तुम्ही कुठच मागे पडु शकणार नाही.
आज मातृभाषेकडे पालकांची ओढ कमी होत असुन इंग्रजी शाळेकडे प्रत्येकजन धावत आहे. पण सुसंस्कृत शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे.ही खंत आहे.
आपली मराठी भाषा टिकविण्यासाठी ,सुसंस्कृत राहण्यासाठी पालकानी मातृभाषेतुन पाल्या शिक्षण देण्याची गरज आहे.
असे मत बैलूर हायस्कूलचे मुख्याध्यापक समरसिंह पाटील यानी शनिवारी खैरवाड सरकारी प्राथ.मराठी शाळेच्या १९९७-९८सालच्या इ.७ वीच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळव्या प्रमुख वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक अनंत पाटील होते. तर व्यास पिठावर माजी शिक्षक के.वाय.पाटील,मारूती नाईक,एस व्ही लमानी,सौ.मंजुळा कांबळे,सौ.प्रिया चव्हाण,पी.एच.पाटील,मुख्याध्यापिका सौ.ए.आर.जेटगी,एसडीएमसी अध्यक्ष भुजंग हुंजरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक माजी विद्यार्थी मंजुनाथ बस्तवाडकर यानी केले. मुलींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाले. तर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलन तर ग्राम पंचायत सदस्य रूक्माणा झुंजवाडकर यांच्याहस्ते फोटो पुजन करण्यात आले.
सन १९९७-९८ सालच्या इयत्ता ७ वीचे माजी विद्यार्थी मंजुनाथ बस्तवाडकर, मारूती कोलेकर,परशराम कोलेकर, जोतिबा कोलेकर, देवराज पाटील,विद्यार्थीनी सौ.राणी भुजगुरव,सौ.अनिता जुंजवाडकर,सौ.दीपा पाटील,आदीनी आपल्या आठवणीना उजळा दिला.
यावेळी आजी माजी शिक्षक, माजी विद्यार्थ्याचा,एसडीएमसी सदस्य व पाहुण्यांचा शाल,पुष्पहार,मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी शिक्षक रमाकांत पाटील यानी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत.यासाठी पालकाना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत्त शिक्षक संजीव वाटूपकर व एम पी गीरी यानी केले.
तर आभार माजी विद्यार्थी जी.एन बाणकर यानी मानले.
कार्यक्रमाला आजी माजी विद्यार्थी,पालक ,गावचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खैरवाड (ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या सन १९९७-९८ सालाच्या इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा आज शनिवारी दि.१४ जून रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
खैरवाड येथील प्राथमिक मराठी शाळेच्या पटांगणावर होणारा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा दोन सत्रात होणार आहे.
पहिल्या सत्रात स्नेह मेळाव्याचे उदघाटन, आजी माजी शिक्षकांचा सत्कार ,विद्यार्थ्याचा सत्कार व वक्त्यांचे मनोगत.
दुसर्या सत्रात माजी विद्यार्थ्याचा वर्ग, जुन्या आठवणीना उजाळा त्याचबरोबर इतर कार्यक्रम होणार आहेत.
तरी कार्यक्रमाला आजी माजी विद्यार्थी ,शिक्षकवर्ग,तसेच शिक्षकप्रेमी ,पालक वर्ग नागरीक तसेच तालुक्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी विद्यार्थी १९९७-९८ ची बॅच व एसडीएमसी समिती. मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाच्या वतीने करण्यात आले आहे.