
#एम.एल.सी.चन्नराज हट्टीहोळी याची माहिती. गावकर्याच्याहस्ते सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
कसबा नंदगड ( ता.खानापूर ) गावाजवळील खानापूर यल्लापूर राज्यमार्गाला लागुन असलेल्या व्हन्नव्वादेवी तलावाच्या विकासासाठी लघुपाटबंधारे खात्यामार्फत शासनाकडुन दीड कोटी रूपयाचा निधी मंजुर झाल्याची माहिती एम एल सी चन्नराज हट्टीहोळी यानी नुकताच खानापूर दौर्याच्या वेळी दिली.
या तलवाचे काम मलनाडु विकास योजनेंतर्गत होणार असुन याचा लाभ गावकर्याना होणार आहे.
यानिमित्त कसबा नंदगड ग्राम पंचायतीच्यावतीने माजी अध्यक्ष व विद्यामान सदस्य प्रविण पाटील,तसेच अध्यक्ष ,सदस्य व नागरीक आदीच्या उपस्थितीत शाल,पुष्पहार,पुष्पगुच्छ देऊण सत्कार करण्यात आला.
कसबा नंदगडचा व्हन्नव्वादेवीचा तलाव खानापूर यल्लापूर राज्यमार्गा लागुन असल्याने येथून येजा करणार्या प्रवाशाचे हा तलाव आकर्षन ठरतो.या तलवाच्या पाण्यावर अनेक शेकडो एकर भात जमिन पिकविली जाते. शिवाय याभागातील जनावराना पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्याने तलवाची खोली करून विकास साधावा अशी मागणी या भागातील जनतेतुन होत आहे.
यासंदर्भात ग्राम पंचायत प्रविण पाटील यानी एम एल सी चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडे तलावा बाबत गार्हाणी मांडुन तलावाच्या विकासाची मागणी केली होती.याबाबतचे निवेदन दिले होते.
याची दखल घेऊण एम एल सी चन्नराज हट्टीहोळी यानी सरकारकडुन दीड कोटी रूपयाचा निधी मंजुर करून दिला.
यामुळे कसबा नंदगड परिसरातील नागरीकातुन समाधानाचे वातावरण पसरले आहे.
.