
#शिवारातील भात गंज्या विस्कटून नुकसान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुका म्हणजे अति जंगलाचा तालुका त्यात जंगली प्राण्याकडुन होणारे नुकसान त्यामुळे खानापूर तालुक्यातील शेतकरी वैतागले आहेत.
खानापूर तालुक्यात वर्षभरच हत्तीकडुन पिकाचे नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी मडवाळ,घोटगाळी,शिवठाण,शिंदोळी सह कापोलीभागात ९ हत्तीच्या कळपाने भातपिकाचे नुकसान केले आहे. ह्या घटना ताज्या असतानाच आता या ९ हत्तीच्या कळपाने गुंजी परिसरातील भटवाडा,भालके,वाटरा, कामतगा आदी भागात शिवारातील उभ्या भात पिकाबरोबर भातगंज्या विस्कटून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
गुंजी भागात सुगी काळात पावसाने हजेरी लावुन सुगीचे हंगाम लांबणीवर टाकले. पावसामुळे भात पिकाचे नुकसान झाले. त्यात सुगीला उशीर झाला. अशातच हत्तीच्या कळपाने शिवारातील भात पिकांचे नुकसान केल्याने शेतकर्याना डोकीला लावण्याची वेळ आली आहे.
गेल्या दोन दिवसात कामतगा शिवारातील ज्ञानेश्वर घाडी, मारूती जोशिलकर,वामन नाईक ,पाडु नाईक,अशोक गवाळकर ,शिवाजी गवाळकर,तसेच भटवाडा येथील शंकर चौगुले,धनाजी चौगुले ,रेणूका शहापूरकर त्याचबरोबर भालके येथील शांताराम आळवणे,यांच्या भात पिकांचे नुकसाने झाले .
# जमिनीत ओलावा भातमळण्या लांबणीवर!
गुंजी परिसरात एकिकडे हत्तीचे अगमन तर दुसरी कडे जमिनीत ओलावा त्यामुळे भात मळण्या करणे कठीण अशी आवस्था शेतकरी वर्गाची झाली.
ऐन सुगीच्या काळात पावसाने हजेरी लावली त्यामुळे जमिनीत ओलावा झाला. तर दुसरीकडे ऐन सुगीत हत्तीचे अगमन झाल्याने भात पिकाचे हत्तीकडुन नुकसान होत आहे.
मंगळवारी ही गुंजी परिसरात हत्तीनी हजेरी लावली होती.यामध्ये गंगराम पाटील ,रामु काळीचे यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
गुंजी परिसरात जवळपास १० हत्तीचा धुमाकुळ सुरू आहे.यातील चार पाच हत्ती भटवाडा परिसरात तर एक हत्ती तळपांडे जंगलात विश्रांती घेत असुन चार हत्तीनी कामतगा जोमतळा भागात वास्तव्य केले आहे.
याकडे कोण लक्ष देणार असा सवाल शेतकरीवर्गातुन विचारला जात आहे.