#हल्लेखोर स्वत:हुन पोलिस स्टेशनमध्ये हजर!
खानापूर प्रतिनिधी
भर दिवसा मंदिरात बैठक बोलवुन वाद मिटविण्यासाठी बोलविलेल्या खानापूर शहराजवळील गांधीनगरात बैठकीत तरूणाच्या पोटावर चाकूने सपासप वार केल्याने त्या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दि.३ रोजी घडली. त्यात सुरेश तिमान्ना बंडीवड्डर (वय ३१) असे त्याचे नाव आहे.
तर चाकू हल्ला करणारा यल्लापा शांताराम बंडीवडर (वय ६०) हा स्वताहुन पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती गांधीनंगर येथील मंदिरात यल्लापा बंडीवड्डर व सुरेश बंडीवड्डर याच्या वाद होता.त्याच्या समाजातील पंचानी वाद मिटविण्यासाठी रविवारी मंदिरात बैठक बोलविली होती. बैठक चालु असताना यल्लापाने सुरेशवर चाकू हल्ला केला.त्यात तो गंभीर जखमी झाला. लागलीच त्याला खानापूर सरकारी दवाखाण्यात उपचारासाठी पाठविले.परंतु जखम गंभीर असल्याने बेळगावाला घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला.
हल्यात सुरेशला वाचविण्यास गेलेल्या सागर अष्टेकर याला ही चाकू लागुन तो ही जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच लागलीच खानापूर पोलिस निरीक्षक लालसाब गवंडी यानी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी वातावरण तंग झाल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तर चाकू हल्ला केलेला यल्लापा बंडीवड्डर हा स्वत:हुन चाकूसह पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला.
दोघोत कोणता वाद होता.याचा पोलिसानी उलघडा अद्याप केला नाही. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.