
खो खो, व्हाॅलीबाॅल स्पर्धेत प्रथम!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या खेळांडुनी नुकताच झालेल्या झोनल स्पर्धेत विविध खेळात यश संपादन करून शाळेचे नाव उज्वल केले आहे.
वैयक्तीक स्पर्धेत मारूती अजीत पाटील याने १०० मीटर धावणे तृतीय, लांब उडी व्दितीय क्रमांक ,हार्डल्स प्रथम क्रमांक, समक्ष कुंभार २०० मीटर व्दितीय क्रमांक, गोळा फेक प्रथम क्रमांक, डीस्कस थ्रो व्दितीय क्रमांक, सक्षम कुंभार ४०० मीटर धावणे व्दितीय क्रमांक, उंच उड्डी प्रथम क्रमांक, श्रेयश कुंभार २०० मीटर धावणे,
सांघिक खेळात खो खो प्रथम क्रमांक, व्हाॅली बाॅल प्रथम क्रमांक, रिले प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
विजयी खेळाडुना मुख्याध्यापिका,क्रिडाशिक्षक व इतर शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले.
विजयी खेळाडुचे तालुक्यासह गर्लगुंजी परिसरात अभिनंदन होत आहे.