
#समाजसेवक अनंत गावडे यांचा इशारा!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा जंगलमय तालुका आहे.
भीमगड अभयारण्यातील गावाचे स्थलातर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या गावांचा येत्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्धार केलेला आहे.
भीमगड अभयरण्यातील जवळपास १६ खेड्यांचा समावेश असुन पुढे येणार्या कोणत्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे मत समाज सेवक अनंत गावडे यानी बोलताना सांगीतले.
यावेळी यापुढे कोणतीही निवडणुक असो मग तालुका पंचायत निवडणुक असो किंवा जिल्हा पंचायत असो विधानसभा निवडणुक असो .
तेव्हा यासर्व १६ खेड्यांतील मतदाराचा बहिष्कार घालण्याचा निर्णय या खेड्याच्या लोकांनी घेतलेला आहे.या संदर्भात येत्या गणेश चतुर्थीला गवळी वाडा ते १६ खेड्यांतील नागरीकांंची बैठक बोलविण्यात येणार आहे .आणि निवडणुकावर बहिष्काराचा निर्णय घेण्यात येणार आहे
देगाव रस्त्यात चिखलाचे साम्राज्य .याला वाली कोण?
अनंत गावडे यांनी मांडली कैफियत!
खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील देगाव हेमाडग्यापासून पाच किलोमीटर असलेल्या देगाव रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून येजा करणे कठीण होणार आहे.
निवडणुक आल्या की निवडून येई पर्यंत मी हे करतो मी ते करतो असं सांगतात निवडून आल्यावर फिरकून सुद्धा कोण बघत नाहीत.
याची प्रचिती आज देगाव गावच्या नागरीकांना आली आहे.
असे मत देगावचे सामाजिक कार्यकर्ते अनंत गावडे यानी बोलून दाखविले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की या भागात कोणी पेशंट असला की अत्यंत बिकट प्रसंग उदभवतो. ह्या चिखलामुळे एखादे वाहन सुद्धा जात नाही. तेव्हा आमदारासह शासनाने लक्ष घालावे .सर्व पक्षाचे नेते आमदार सर्वे निवडून येईपर्यंत मी करतो आम्ही करतो असे म्हणतात. आणि भीमगड अरण्यामुळे तिकडे कोणी फिरकुन ही बघत नाही .कुणी ही लक्ष घालत नाही कुणाला पण विचारलं तर सांगतात गाव उठणार आहे.असं उत्तर देतात . गाव उठून प्रत्येक कुटुंबाला पंधरा लाख देण्यापेक्षा तेवढ्या निधीतुन रस्ता, लाईट इतर सोयी कराव्यात.
सध्या या रस्त्याची दुरावस्था पाहुन येत्या पावसाळ्यात देगांव नागरीकानी पावसाळा कसा काढावा.असा यक्ष प्रश्न सर्वाना पडला आहे.