
#खानापूरात हाॅकी ग्राऊंड नसतानाही मिळेल त्या ग्राऊंडवर सराव!
#४ हाॅकी पट्टू मुलींचे तालुक्यातुन कौतुक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात इतकी वर्षे हाॅकी खेळाचा गंधही नव्हंता. त्याच तालुक्यातील चार हाॅकी खेळाची सुरूवात होऊन चक्क तालुक्यातील ४ हाॅकी पट्टू मुलींची म्हैसुर येथील युथ स्पोर्टस् हाॅस्टेल साठी निवड झाली. त्यामुळे खानापूरच्या ४ हाॅकी पट्टू मुलीनी खानापूरचा लौकीकात मानाचा तुरा रोवला.
खानापूर तालुक्यातील हाॅकी पट्टू मुली या साक्षी संदीप पाटील (असोगा), मयुरी कंग्राळकर (नंजिलकोडल), साक्षी चौगुले तसेच आयेशा शेखा आदीचा समावेश आहे.
या चारही हाॅकी पट्टू खेळांडू खानापूरच्या ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थीनी आहेत.
या सर्व हाॅकी पट्टू खेळांडुचे ज्यूनिअर काॅलेजचे शिक्षण व हाॅकी प्रशिक्षण सरकारकडुन मोफत मिळणार असल्याने भविष्यात त्याचा मार्ग सुखकर होणार आहे.
या हाॅकी पट्टूना बेळगाव हाॅकी संघटनेचे सरचिटणीस व प्रशिक्षक सुधाकर चाळके,उत्तम शिंदे,तसेच संघटनेचे अध्यक्ष गुळापा होसमनी त्याचबरोबर खानापुरचे निवृत्त जवान गणपत गावडे आदीचे मार्गदर्शन मिळत आहे.
हाॅकी पट्टू मुलीची स्पोर्ट हाॅस्टेलसाठी निवड झाल्याने खानापूर तालुक्यातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.