
#उद्या पारिश्वाड,इटगी भागातील पुरूषासाठी जागृती व आँपरेशन !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर सरकारी हाॅस्पिटलच्यावतीने तालुक्यातील पुरूषासाठी नसबंदी जागृती कार्यक्रम दि २२ नोव्हेबर ते २८ नोव्हेंबर व २९ नोव्हेंबर ते ४ डिसेबर मोफत पुरूषासाठी नसबंदी आँपरेशनचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ .महेश किवडसवन्नार यानी दिली.
यावेळी ते म्हणाले की ,महिलाची मुलाची आँपरेशन झालेली असतात.त्यात नसबंदी आँपरेशन म्हणजे महिलाना जास्तीचा त्रास असतो. तो त्रास कमी व्हावा. म्हणून परुषाना नसबंदी आँपरेशन करून कुटूबाला सहकार्य करने गरजेचे आहे.
नसबंदी आँपरेशन झालेल्या पुरूषना सरकार ११०० रूपये प्रोहत्साहन धन दिले जाते. केवळ दोन तासात न टाके घालता,अर्धा तासात आँपरेशण करून एक दिवस विश्रांती घेऊण दुसरे दिवशी आपल्या कामाला जाऊ शकतो.
तेव्हा पुरूषांनी याचा लाभ घ्यावा. यासाठी तालुक्यातील पारिश्वाड, इटगी याभागासाठी एक दिवस ,लोंढा,कक्केरी,बिडी ,नंदगड भागासाठी एक दिवस तर कणकुंबी ,जांबोटी,गर्लगुंजी व खानापूर शहरासाठी एक दिवस जागृती कार्यक्रम होणार आहे. एक दिवस पुरूष आँपरेशन कार्यक्रम होणार आहे.
तरी तालुक्यातील पुरूषानी या संदीचा लाभ घ्यावा .
असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.महेश किवडसन्नावर यानी केले आहे॥