
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील)
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील चव्हाट गल्लीतील महिला यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्हीही गर्लगुंजी
यांचे ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी वयाच्या 68व्या वर्षी,अल्पशा आजाराने निधन झाले.आज आकरव्या दिनी त्यांच्या विषयी थोडक्यात परिचय…….
कै.सौ.यल्लूबाई मल्लू निट्टूरकर
यांचा जन्म गर्लगुंजी (ता. खानापूर ) गावामध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये इ.स.१९५६ मध्ये झाला.त्यांच्या आईचे नांव आनंदीबाई व वडिलांचे नांव म्हात्रू यल्लुप्पा गोरे.त्यांना कृष्णा,तुकाराम आणि शंकर असे तीन भाऊ तसेच प्रेमा आणि गंगू अशा दोन बहिणी आहेत.यल्लुबाई यांचे महेरकडील नांव लीला असे होते.सर्वात मोठी बहीण असल्यामुळे गोरे कुटुंबाचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम असायचे. इ.स.१९७१ मध्ये गावातीलच एक प्रतिष्ठित व्यक्ती मल्लू शंकर निट्टुरकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.त्यांच्या पतीना गवंडी व्यवसायाबरोबरच भजणी,नाट्यकला आणि समाजकरणाची आवड असल्यामुळे या माऊलीने त्यांना समर्थपणे साथ दिली.त्यामुळेच ते कृषी पत्तीन सोसायटीचे अध्यक्ष तसेच गर्लगुंजी ग्राम पंचायत वर निवडून येऊन उपाध्यक्ष झाले.यांच्याच आशीर्वादाने त्यांचा मुलगा कुंभार मशीन बनवायचा व्यवसाय सांभाळत सलग ८ वर्षे तालुका अध्यक्ष, बजरंग दल म्हणून समाजसेवेचे कार्य केले.येवढेच नाही या माऊलीच्या आशीर्वादानेच त्यांची सून सौ.अनुराधा नंदकुमार निट्टुरकर या ग्राम पंचायतच्या अध्यक्षा होऊन गावाला एक विकासाची दिशा दिली.
त्याचबरोबर आपल्या दोन विवाहित मुली सौ.नंदिनी विलास कदम, मन्नुर ,आणि सौ.अस्मिता दत्ताराम शिवाठणकर यांनाही संसरमध्ये हातभार लावून आज सर्वांना सोडून ही माता देवाघरी निघून गेली.त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.