
#बसेस वेळेत सोडा.शैक्षणिक नुकसान टाळा विद्यार्थ्याची मागणी!
# ग्रा.पं.सदस्य प्रसाद पाटील यांनी घेतला पुढाकार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) गावची बससेवा सुरळीत नसल्याने बेळगाव व खानापूर शहराच्या ठिकाणी शाळा,काॅलेज शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
मुख्य करून खानापूरला शाळा ,काॅलेजला जाणार्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
म्हणून चक्क बालदिन दिवशीच म्हणजे गुरूवारी दि १४ नोव्हेबर रोजी गर्लगुंजी (ता. खानापूर ) गावच्या वेशीत विद्यार्थ्यानी सकाळी रास्तारोको करून उशीर आलेल्या बसेस आढविल्या.
या रास्तारोकोला काॅग्रेस नेते व ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यानी विद्यार्थ्याना पाठींबा देत रास्ता रोकोत सहभाग दर्शविला.
लागलीच खानापूर बस आगार प्रमुख संतोष याना माहिती देण्यात आली. लागलीच बस आगार प्रमुख संतोष यानी रास्ता रोको करणार्या विद्यार्थ्याच्या समस्या ऐकूण घेतल्या.
तर काॅग्रेस नेते ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यानी बस वेळा पत्रकसह निवेदन बसआगार प्रमुख संतोष याना सादर केले.
निवेदनात सकाळी खानापूरहुन ६.४५ ला बस सुटेल व गर्लगुंजीला ७.१५ ला पोहचेल.दुसरी फेरी ८.४५ लाहुन सुटेल.व गर्लगुंजीला ९.१५ पोहचेल.
तिसरी फेरी खानापूर हुन १० ला सुटेल व गर्लगु़जी १० .२० पोहचेल. चौथी फेरी खानापूरहुन ११ ला सुटेल गर्लगंजीला ११.२० ला पोहचेल, दुपारी १२.३० वाजता खानापूरेेहुन सुटेल व गर्लगुंजीला १२ .५० पोहचेल, दुपारी २ वाजता खानापूर हुन सुटेल व २.२० ला गर्लंगुजीला पोहचेल,दुपारी ३ वाजता खानापूरहुन सुटेल व सायंकाळी ३ .२० ला गर्लगुंजीला पोहचेल. सायंकाळी ४.१५ ला खानापूर हुन सुट्ल ४.४० ला गर्लगुंजी ला पोहचेल, सायंकाळी ५.३० वाजता खानापूरहुन सुटेल व गर्लगुंजीला ५.५० पर्यत पोहचेल असे बसचे वेळापत्रक दिले आहे.
यावेळी गर्लगुंजीसह निडगल,सन्नहोसुर ,तोपिनकट्टी,भंडरगाळी व बरगांव गावच्या विद्यार्थ्याना बसची सेवा होणार आहे.
रास्तो रोकोला गर्लगुंजी गावचे विद्यार्थी ,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बस आगार प्रमुख संतोष यानी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडविण्याचे आस्वासन दिले.