
धावपटू ज्ञानदेव शिंदे तृतीय, वेंदात होसुरकर सातव्या क्रमांकावर!
खानापूर ( सुहास पाटील )
मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खानापूर येथील मराठा मंडळ हाय्यर सेंकडरी स्कूलच्या दोन खेळांडुनी कोलार येथे राज्य पातळीवर झालेल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.
या धावण्याच्या स्पर्धेत कुमार ज्ञानदेव शिंदे या खेळांडुने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला. तसेच खेळांडू वेदांत हसूरकर या विद्यार्थ्याने राज्यात सातवा क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्वत केले .या यशाबद्दल या दोन खळांडुचे संस्थेचे अध्यक्षा डॉ. राजश्री नाग राजू व ज्येष्ठ संचालक शिवाजीराव पाटील व परशुराम अण्णा गुरव यांचा बहुमोल मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी शाळेचे क्रीडा शिक्षक वाय. एफ. निलजकर व गोमानाचे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभत आहे.या यशाबद्दल या दोन्ही खेळांडुचे सर्वत्र कौतुक होत आहे.