खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी;
इदलहोंड ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक चुरशीने पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी लक्ष्मी बाबू नाईक यांची सहा विरोधी पाच अशा मतांनी निवड झाली आहे तर उपाध्यक्षपदी एकमेव अर्ज असलेल्या सौ रेखा महादेव गुरव यांची निवड झाली आहे.
इदलहोंड ग्रामपंचायतीचे अध्यक्षपद सामान्य महिलेसाठी राखीव होते. तर उपाध्यक्ष पद अ वर्ग महिलेसाठी आरक्षित होते. सत्ताधारी भाजप पक्षाच्या चांगाप्पा कृष्णा बाचोळकर यांच्या गटाने सौ लक्ष्मी बाबू नाईक यांचा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. तर विरोधकांच्या वतीने सौ वैशाली उमेश धबाले यांनी अर्ज भरला होता. झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप उमेदवार सौ लक्ष्मी नाईक यांना सहा मते तर विरोधी पक्ष उमेदवार सौ वैशाली धबाले यांना पाच मते पडली. एक मताने सौ लक्ष्मी नाईक यांनी अध्यक्षपदी बाजी मारली. उपाध्यक्षपदी सौ रेखा महादेव गुरव यांचा एकमेव अर्ज भाजपा सत्ताधारी पक्षाच्यावतीने भरल्यामुळे त्यांची यापदी बिनविरोध निवड झाली. या निवडीसाठी श्री उदय रावसाहेब पाटील सदस्य ग्रामपंचायत यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
यावेळी जनसेवा संघटना अध्यक्ष श्री यशवंतराव हणमंत पाटील, इदलहोंड , सदानंद परशराम होसुरकर भाजपा रयत मोर्चा अध्यक्ष खानापूर, विकास जाधव, अमित पाखरे, चंद्रकांत पाटील, विठ्ठल देसाई ,सोमाना नागेनहटीकर, विठ्ठल देसाई ,प्रकाश जाधव, किरण पाटील,धोंडीबा पाटील व जनसेवा सोसायटी उपाध्यक्ष परशराम बाचोळकर व बाळगौडा पाटील, जगन्नाथ कुंभार,एन डी पाटील, यल्लाप्पा होसुरकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माळअंकले व इदलहोंड झाड अंकले ,सिंगिंनकोप ,खेमेवाडी गावातील भाजपा प्रेमी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. एकंदरीत ही सर्व निवडीची प्रक्रिया चांगाप्पा कृष्णा बाचोळकर माजी अध्यक्ष ग्रामपंचायत यांच्या अध्यक्षतेखाली परिश्रम घेऊन राबविण्यात आल्याचे भाजपा पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर विजयी उमेदवारांचे पि.डि.ओ बळीराम देसाई व सचिव एन ए पाटील यांनी अभिनंदन केले