#खानापूर तालुक्यातुन अभिनंदन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
आजकाल पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील प्रत्येक क्षेत्रात कार्य करीत आहेत. विशेषतः सुविधांनी संपन्न असलेल्या शहरी भागात महिलांचे वर्चस्व दिसून येते. पण ग्रामीण भागात अजूनही शिक्षण आणि रोजगार याबाबतीत हवा तितका सकारात्मक परिणाम दिसत नाही याची कारणे अनेक असतील. जांबोटी कणकुंबीसारख्या दुर्गम परिसरातील मुली आज सुशिक्षित होऊन विविध क्षेत्रात पदार्पण करू लागले आहेत. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कुमारी अक्षता प्रमोद किनारी होय. नुकताच अक्षताने आपले वकीली विषयक शिक्षण पूर्ण करून वकिलीची सनद मिळविली आहे . जांबोटी परिसरातील पहिली महिला वकील होण्याचा मान तिने मिळवला आहे.त्याबद्दल परिसरात तिचे अभिनंदन होत आहे.
जांबोटी येथील प्रतिष्ठित पंच कै. रामभाऊ किनारी यांची अक्षता ही नात आहे. वडील प्रमोद किनारी हे शेतकरी असून आई स्नेहल किनारी ही गृहिणी आहे. कु. अक्षता ही सुरुवातीपासूनच एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. अतिशय कष्टातून शिक्षण पूर्ण करताना आई- वडिलांचे प्रोत्साहन व गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे हे साध्य झाल्याचे ती सांगते. तिचे प्राथमिक शिक्षण बालिका आदर्श विद्यालय बेळगाव येथे झाले असून बेल्लद लॉ कॉलेज येथून तिने एलएलबीचे शिक्षण घेतले. नुकताच तिला बेंगलोर बार असोसिएशन व उच्च न्यायालय येथून वकिलीची सनद मिळाली आहे.त्यामुळे जांबोटी भागातील पहिली महिला वकील म्हणून परिसरात तिचे अभिनंदन होत आहे.