संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तत्कालीन केंद्र सरकारने बहुसंख्य मराठी भाषिकांच्या भावनांना तिलांजली देत १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती केली, यासाठी सीमाभागातील मराठी जनता हा दिवस काळा दिन म्हणून सुतक पाळते. ७० वर्षांपासून चालू असलेल्या लढ्याला न्याय द्यायचा असेल तर मराठी भाषिकांची एकजुट महत्वाची आहे
१७ जानेवारी १९५६ साली तात्कालीन केंद्र सरकारने चाळीस लाख मराठी जनतेवर अन्याय करत हा सीमाभाग मैसूर प्रांतात डांबला व १नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची निर्मित केली. सीमाभागातील मराठी भाषिकांनी अनेक आंदोलने व चळवळ्या केल्या, अनेकजण हुतात्मे झाले,तुरुंगवास भोगला पण अजूनही यश आले नाही. कर्नाटकी सरकारचा होणारा भाषिक अत्याचार व तत्कालीन केंद्र सरकारने केलेल्या अन्यायाचा निषेध बहुसंख्येने करण्यासाठी धरणे सत्याग्रह यशस्वी करून पुन्हा एकदा आपली ताकत दाखवून देऊया असे आवाहन
अध्यक्षीय भाषणात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष सुर्याजी पाटील यानी लक्ष्मी मंदिरात आयोजित काळा दिन कार्यक्रमात बोलताना केले.
प्रारंभी समितीचे सरचिटणीस राजू पाटील यानी काळा दिनाचा वृत्तात सांगीतला. व आगामी निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले .येणार्या काळीत तालुका पंचायत व जिल्हा पंचायत तसेच ग्राम पंचायत निवडणुका होणार आहेत .तेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यानी आपापल्या मत दार संघात संपर्क दौरे काढुन आपले कार्य पोहोचवावे.असे आवाहन केले.
यावेळी कर्नाटक राज्य शिवसेना उपाध्यक्ष के पी पाटील म्हणाले की, कर्नाटक सरकारकडुन मराठी भाषिक जनतेवर सातत्याने होणारा अन्याय चव्हाट्यावर आणत, महाराष्ट्र शासनाने सीमा
वासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आणि केंद्र सरकारकडून हाग प्रश्न आक्रमक भूमिका मांडण्याची मागणी केली.यावेळी सुरेश देसाई यानी विचार मांडले.
यावेळी समितीचे जेष्ठ नेते पी एच पाटील,सुरेश देसाई, बळीराम पाटील, कर्नाटक राज्य शिवसेना उपाध्यक्ष के पी पाटील, किरण पाटील, विनायक सावंत, प्रतिक देसाई, अर्जून देसाई, यल्लापा बाचोळकर आदी समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
