खानापूर बाजारात पत्रके वाटुन काळादिनाची जनजागृती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या
वतीने रविवारी दि.२५ रोजी खानापूर शहरातील शिव स्मारक ,सस्टेशनरोड, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ, भाजी मार्केट, बुरूड गल्ली, आदी ठिकाणी जनजागृती करून १ नोव्हेबर रोजी ७१ वा काळादिन निषेदपर गांभीर्याने पाळुन व कडकडीत हरताळ पाळुन आपल्या मराठी भाषिकांच्या भावना केंद्र सरकार व कर्नाटक सरकारला समजाव्यात व आपला कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. या आशयाचे पत्रक वाटण्यात आले
यावेळी खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते.माजी आमदार दिगंबर पाटील, माजी सभापती मारुती परमेकर,माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बेळगावकर, मद्यवर्तीचे सदस्य राजाराम देसाई, युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील,वसंत नवलकर,रमेश धबाले, पुंडलिक पाटील,गोपाळ पाटील,पांडुरंग सावंत, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील सरचिटणीस आबासाहेब दळवी
संजीव पाटील,रवींद्र शिंदे,बाबुराव पाटील,जयसिंग पाटील,प्रकाश चव्हाण, मोहन गुरव, आप्पाराव मुतकेकर, ज्योतिबा खाडे,देवाप्पा भोसले, किरण पाटील, कृष्णा मनोळकर, मरू पाटील, गजानन बेळगावकर, नाना घाडी, विठ्ठल गुरव,शंकर गुरव, आदी समिती कार्यकर्ते नेते हजर होते.