सत्ताधारी भाजप पक्ष उदासिन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणीचे आरक्षण येताच तालुक्यात निवडणुकीचे वारे सुटले तसे तालुक्यातील ब्लॅाक काँग्रेस व खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुक संदर्भात बैठक्या पार पडल्या.त्यामुळे कार्यकर्त्यातुन निवडणुकीसंदर्भात उत्साह निर्माण झाला.तसेच कार्यकर्ते कामाला लागले.इच्छुक कार्यकर्त्यातुन एक नविन उमेद निर्माण झाली.
मात्र तालुक्यात सत्ताधारी भाजप पक्षाच्या गोटात मात्र स्मशान शांतता अद्याप आहे.भाजपने ९२ हजार मताचा पला गाठून आमदार निवडुन आणला.म्हणजे खानापूर तालुक्यात ६ जिल्हा पंचायत सदस्य व २० तालुका पंचायत सदस्य हे भाजपचे निवडुन येणार अशा भ्रमात असल्याने खानापूर तालुका भाजप पक्षाला तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुक संदर्भात बैठक्या घेण्याची गरज भासत नसल्याचे दिसुन येत आहे.
मात्र खानापूर तालुक्यात भाजपकडुन म्हणाव्या तशा समस्या सुटल्या नाहीत.विकासाबाबत तालुका १५ वर्षे मागे गेल्याचे काॅग्रेस कडुन बोलले जात आहे.त्यामुळे विकासाबाबत खानापूर तालुक्यातील जनतेतून कमालीची नाराजी आहे. असे विरोधकांचे म्हणने आहे
याचाच फायदा उठवून काॅग्रेस पक्ष व खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुक लढविण्यास तयारी दर्शविली आहे.विभागवार चर्चा करून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.त्यामुळे काॅग्रेस , समितीने निवडणुक लढविण्याच्या तयारीला वेग घेतला आहे.
मात्र तालुक्यात सत्ता मिळविलेल्या भाजप पक्षात कोणतीच हालचाल दिसत नाही.त्यामुळे तालुक्यात वेगळीच चर्चा होताना दिसत आहे.
