#मंगळवारी ज्योतीचे प्रस्तान!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील शिव स्मारक चौकात कित्तुर राणी चन्नमा ज्योतीचे आगमन होताच, खानापूर नगर पंचायतीचे चीफ आँफिसर संतोष कुरबेट यानी स्वागत केले.
प्रारंभी नगरपंचायतीचे अधिकारी राजू जांबोटी यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी चिफ आँफिसर संतोष कुरबेट यांच्याहस्ते कित्तूर राणी चन्नमा ज्योतीचे पुष्पहार घालुन पुजन केले.
यावेळी कार्यक्रमाला नगरपंचायतीचे मुख्य चिफ आँफिसर संतोष कुरबेट, राजू जांबोटकर, प्रेमानंद नाईक, संजू काद्रोळी, मोसिन बडे घर, श्री.गदगीनमठ, तहसील कार्यालयाचे श्री चक्के कर आदी उपस्थित होते.
यावेळी कित्तुर राणी चन्नमा ज्योतीचे खानापूरात दोन दिवस मु्क्कामानंतर मंगळवारी सकाळी खानापूरातुन बेळगाव मार्गे प्रस्तान होणार आहे.