#घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी जनतेला माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील हेस्काॅम कार्यालयाच्या आवारात उद्या गुरूवारी दि.१५ ते शनिवारी दि.१५ आँक्टोबर पर्यत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेची माहिती सर्वजनते पर्यत पोहोचविण्याच्या उद्देशाने हुबळी विधुत पुरवठा कंपनी व खानापूर उपविभागाच्यावतीने तीन दिवस सेवा सेतु अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार उपस्थित राहणार आहेत.
या प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत घराच्या छतावर सौर उर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी पात्र घरगुती वीज ग्राहकाना केंद्र सरकारकडुन अनुदानाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे.यायोजनेची माहिती खानापूर तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरीकाना मिळावी आणि जास्तीत जास्त पात्र ग्राहकाना या योजनेचा लाभ व्हावा.या य़ोजनेचा उद्देश आहे.
याकार्यक्रमातुन जनेतला योजनेची माहिती सौर उर्जा प्रकल्पाचा लाभ,व सरकारच्या अनुदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
घरच्या छतावर सौर उर्जा यंत्रणा बसविल्याने वीजबिलीवरील खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे पात्र घरगुती वीज ग्राहकानी या योजनेची माहिती घेऊन तिचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
यासंदर्भात खानापूर शहरातील हेस्काॅमचे कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले यानी दि.१४ आँक्टोबर रोजी अभियनाची माहिती दिली.व जनजागृती करण्याचे आवाहन केले.