#जिल्हाधिकारी व राज्याच्या मुख्य सचिवांकडे युवा समितीचे निवेदन व ईमेलद्वारे मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका गट शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या दोन ते तीन महिण्यापासुन बी ई ओ .रामप्पा पी हे निवृत्त झाल्या नंतर कायमस्वरूपी बी ई ओअधिकारी नसल्याने प्रभारी बीईओ म्हणून मंजुनाथ हत्ती यांच्याकडे अतिरिक्त भार देण्यात आला आहे, बी. आर. सी.व गट शिक्षणाधिकाऱ्याचा भार त्यांच्यावर असल्याने दुर्गम व व्याप्ती मोठी असलेल्या खानापूर तालुक्याला ते पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत.
यामुळे शिक्षण क्षेत्राची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाल्याने यासाठी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष तथा सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी २३ सप्टेंबर रोजी खानापूर गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट देऊन तेथील वस्तुस्थिती जाणून घेतली होती, त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाला निवेदनही देण्यात आले. व त्याच बरोबर मुख्यमंत्री कार्यालय तसेच राज्याच्या मुख्य सचिव यांना मेलद्वारे सुद्दा याची माहिती दिली होती, यावर पुढील कार्यवाहीसाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांच्या कार्यालयातून दिल्याचं मेलद्वारे कळविण्यात आले होते. यावर तात्काळ कार्यवाही व्हावी.
त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्था ही कोलमडल्याचे दिसून येत असून तालुका आरोग्यधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार विरोधी पथकाने कारवाई करून निलंबित केल्याने तिथेही अतिरिक्त भार देऊन डॉ.संजीव नांद्रे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी कायस्वरूपी डॉक्टरांच्या जागा रिक्त असून त्याठिकाणी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर नेमण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून रुग्णांची हेळसांड होत आहे. तज्ञ व कायमस्वरूपी डॉक्टर नेमन्या बरोबरच या दोन मागण्यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी .मोहम्मद रोशन यांनी खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्यासाधिकारी नेमावा, आशा आशयाचे निवेदन आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील,मुख्य सल्लागार अशोक घगवे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले,उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर, सुरज जाधव,श्रीकांत नांदूरकर,जोतिबा येळ्ळूरकर,विकास कलघटगी आदी उपस्थित होते.