#शेतकर्याचे आर्थिक नुकसान!
शेतकर्याना नुकसान भरपाई देण्याची भाजप नेते बाबा देसाई यानी केली मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील मडवाळ गावच्या मेलकी शिवारातील सर्वे नंबर ८४ जमिनीतील भात पिकांचे बुधवारी दि.३० सप्टेंबर रोजी हत्तीच्या कळपाने भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे.
हातातोंडाशी आलेल्या भात पिक हत्तीनी तुटवून जमीन दोस्त केले.त्यामुळे शेतकर्यानी वर्षभर कलेले काबडकष्ट वाया गेल्याची भिती व्यक्त होत आहे.
नुकसान भरपाई नको पण हत्तीचा बंदोबस्त करा!भाजप नेते बाबा देसाई!
मडवाळ गावच्या शिवारात हत्तीकडुन भात पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.त्यामुळे शेतकर्याच्या भात पिकाची नुकसान भरपाई देण्यापेक्षा वनखात्याने हत्तीचा कायमचा बंदोबस्त करावा.आणि शेतकर्याना चांगले जीवन जगायला मिळूदे यासाठी नुकसान भरपाई देण्यापेक्षा हत्तीचा कायमचा बंदोबस्त करा अशी मागणी भाजप ने ते बाबा देसाई यानी केली आहे.