#खानापूर तालुका निवृत्तशिक्षक संघाच्या सभेत मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सरकारने ७ व्या वेतन आयोगाची सुधा रात आवृत्ती सरकारी निवृत्त कर्मचार्याना लागु करावी.अशी मागणी करत या शैक्षणिक वर्षाची सहल काढण्याची चर्चा करण्यात आली.तसेच निवृत्त शिक्षक सभासदांच्या कार्यालयीन व वैयक्तिक समस्यावर बुधवारी दि.३० रोजी खानापूर येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात झालेल्या खानापूर तालुका निवृत्त शिक्षक संघाच्या सभेत चर्चा करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष डी एम भोसले गुरूजी होते
प्रारंभी एन.एम.पाटील यानी प्रास्ताविक केले.तर सचिव ए. एम.पाटील यानी संघाचा वार्षिक अहवाल सादर केला.
सभेचे औचित्य साधुन निवृत्त शिक्षक जयसिंगराव पाटील, ईश्वर ओऊळकर,रमाकांत पाटील,या शिक्षक सभासदाचा वाढदिवसानिमित्त शाल, पुष्प हार घालुन वाढदिवस सा जरा करण्यात आला.
यावेळी सभेला व्ही.यू.,देसाई,एम ए खांबले,जी एस हेब्बाळकर,वाय. बी पाटील,एम जी घाडी,बी एन पाटील,आदी शिक्षक सभासदानी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ केल्या.सभेला तालुक्यातील निवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार संभाजी पाटील यानी मानले.