#उस,भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान!
खानापूर प्रतिनिधी
निलावडे ( ता.खानापूर ) परिसरातील कबनाळी,आंबोळी,मुघवडे,बांदेकरवाडा,कोकणवाडा आदी भागात हत्तीनी ऊस,भात, केळी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान करून हत्तीनी नेरसा ( ता.खानापूर ) भागात प्रवेश करून नेरसा येथील शेतकरी गजानन मारूती बिरजे यांच्या सर्वे नंबर ७५ मधील शिवारातील दोन एकर जमिनीतील ऊस, भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दोन एकर जमिनीतील दोन टन उस जागीच फस्त केला आहे.
त्यामुळे नेरसा भागातील शेतकर्यातुन भितीचे वातावरण पसरले आहे.
तेव्हा वनखात्याने व लोकप्रतिनिधीनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन संबधीत नुकसान ग्रस्त शेतकर्याला नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी नागरीकातुन होत आहे.
हत्तीचा कायमचा बंदोबस्त करा! तुमची नुकसान भरपाई राहु द्या.
माजी ता.प.सदस्य अशोक देसाई!
निलावडे भागातुन आलेल्या हत्तीनी आता नेरसा भागात ठाणे मांडले आहे.त्यामुळे शेतकरी गजानन बीरजे या शेतकर्याच्या ऊस ,भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
वनखात्याने केवळ नुकसान भरपाई न देता हत्तीचा कायम स्वरूपी बंदोबस्त करावा.त्यामुळे शेतकर्याची कायमची डोके दुखी संपेल, नाहीतर तुटपंज्या नुकसान भरपाई वर गेल्या कित्येक वर्षापासुन शेतकरी समाधान नाहीत.
यासाठी हत्तीचा कायमचा बंदोबस्त करावा.अशी मागणी केली आहे.

