संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या बेळगाव जिल्हा कार्यकारणीची उद्या (बुधवार दि.३०)बेळगाव येथील जी.जी.चिटणीस हायस्कूलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असून यावेळी नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मागील आठवड्यात म्हणूजे शनिवार दि.२६ रोजी बालिका आदर्श विद्यालयात संघाचे राज्य उपाध्यक्ष चिदानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती.यावेळी सर्वानुमते जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली होती.त्यानुसार बुधवार दि.३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ठिक साडेचार वाजता बेळगाव येथील जी.जी.चिटणीस स्कूल टिळकवाडी येथे होणाऱ्या पदग्रहण समारंभात जिल्हा कार्यकारिणीची नावे घोषित (जाहीर) करण्यात येणार असून यावेळी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष संदीप बुधियाळ, उपाध्यक्ष चिदानंद पाटील, संघाचे राज्य सचिव आर.पी.वंटगुडी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन जिल्हा कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.गेल्या तीन चार वर्षापासून संघाचे जिल्हाध्यक्षपद रिकामेच होते.तसेच इतर पदाधिकारी आपल्या शैक्षणिक सेवेतून निवृत्त झाल्याने जिल्हा कार्यकारिणीची निवड करणे आवश्यक होते.त्यानुसार बेळगांव शहर, ग्रामीण व खानापूर तालुकायातील शिक्षकांच्यामधून जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
तरी शिक्षक संघाच्या सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मावळते जिल्हा कार्यदर्शी उमेश कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष आर.आर.कुडतुरकर, माजी खजिनदार एस.ए. कळ्ळेकर यांनी केले आहे.
