बैलगाडा शर्यतीत होते बैलाचे कौतुक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शेतकरी आपल्या बैलाना पोटच्या पोराप्रमाणे बाळगतो.त्याची काळजी पूर्वक जोपसना करतो. बैलगा़डा शर्यतीत मोठ्या उत्साहाने भाग घेऊन बैलांचे कौतुक करतो.अशा शेतकर्याची बैलगाडा शर्यत म्हणजे एक उत्सवच असतो.या साठी शेतकरी शेकडोमैल अंतरावरून
.शर्यतीच्या ठिकाणी हजर होऊन शर्यतीचा आनंद लुटतात.आनंद म्हणजे कष्टकरी शेतकर्याचा उत्सव होय.
असे विचार काॅग्रेस ब्लाॅक अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी यानी शनिवारी दि.२६ रोजी कांजळे (ता.खानापूर) राम लिंग ट्रस्टच्यावतीने आयोजित बैल गा डी शर्यतीच्या उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरमाणी पाटील होते.
यावेळी बोलताना अँड. आय आर घाडी म्हणाले की, बैल गा डी शर्यतीच्या बैलाना आसुडाने बडवून काढतात.त्यामुळे ते जीवांच्या आकांताने पळतात.त्याचा जनावराना अतिशय त्रास होतो.यासाठी बैलगाडी शर्यतीत आसुड न वापरता बैल गा डी शर्यतीचे आयोजन करावे. असे मत व्यक्त केले.व बैलगाडा शर्यतीला ५हजार रूपयाची देणगी जाहिर केली.
शर्यतीचे उदघाटन खानापूर तालुक्याचे आमदार व उपस्थित पाहुण्याच्याहस्ते फित कापून व गाडी हाकुन करण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार तसेच मा जी जि.प सदस्य नारायण कार्वेकर,प्रसाद पाटील,माजी ता प सदस्य अशोक देसाई,सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिर्जे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल,भाजप महिला राज्य सेक्रेट्ररी व क्षत्रिय मराठा समाज राज्य उपाध्यक्षा सौ.धनश्री सरदेसाई, पी के पीएस चेअरमन राजू धुरी, शंकर शास्त्री,ओमाणा नाईक,जयवंत खानापूरकर,राजेश पाटील शिंदोळी ईश्वर बोबाटे आदी मान्य वर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिर्जे म्हणाले की, खानापूर
तालुक्यात गावोगावी शर्यतीना प्रारंभ होतो.तालुक्याचे आमदार अनेक शर्यतीत बैलावर आसुड उगारून शर्यतीचे उदघाटन कतात.तोच आसुड तालुक्याच्या अधिकारीवर उगारला तर तालुक्याचा विकास साधेल. लोकांची कामे होतील अधिकार्यावर वचक ऱाहिले, याचे कारण म्हणजे खानापूर तहसील कार्यालयात नागरीकांच्या शेत उतरार्यातील नाव बदलीसाठी हेलपाटे मारावे लागतात. अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत.ते लोकाच्या समस्याकडे लक्षच देत नाही. यासाठी अशा अधिकार्यावर शर्यतीचा आसुड उगारला, तर अनेक शेतकर्याची,गोरगरीबाची कामे होतील तालुक्याचा विकास होईल.पण हे केव्हा लक्षात येणार असा प्रश्न उपस्थित केला.
संजय कुबल यानी यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकर्याच्या तोंडचे पाणी गेले.तेव्हा खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका घोषित करणे गरजेचे आहे.असे मत व्यक्त केले.
अशोक देसाई म्हणाले की नेरसेगावची लक्ष्मी यात्रा होणार आहे.यासाठी काजळे ते नेरसे रस्ता होणे गरजेचे आहे.
सौ धनश्री सरदेसाई यानी माझी राज्य क्षत्रिय मराठा समाज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझा सत्कार केेल्याबद्दल मी कांजळे गावची ऋणी आहे.अशी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी आमदार म्हणाले की, कबऩाळी,कांजळे ,तसेच निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील उसाचे हत्तीकडुन प्रचंड नुकसान झाले आहे.तेव्हा यंदाच्या गळीत हंगामात पहिला उस कबनाळी,कांजळे, आंबोळी तसेच निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील उसाची सर्वा आदी करतो.असे वचन दिले.त्यामुळे शेतकर्यानी टाळ्या वाजुन स्वागत केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष गा कर यानी केले.तर आभार मा जी ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यानी मानले.
