संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सध्या पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने मलप्रभा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली होती.लागलीच
जळगा बंधार्याला फळ्या घालुन पाणी आडविल्याने सध्या मलप्रभा नदीत पाणी दिसुन येत आहे.त्याच बरोबर खानापूर शहरातील मलप्रभा नदीघाटावर पाण्याची पातळी दिसुन येत आहे.
त्यामुळे खानापूर शहरातील मलप्रभा नदीघाटावर खानापूर नगरपंचायतीने कपडे धुण्यास मनाई केली आहे.मल प्रभा नदीत अथवा नदीघाटावर कोणत्याही प्रकारच्या पुजाचे सामान,फुले ,केळीची पाने नदीपात्रात टाकू नये . यासाठी सुचना फलक लावुन ही याकडे दुर्लक्ष करत मलप्रभा नदी घाटावर कपडे धुणे, कचरा टाकणे सुरूच आहे.
तेव्हा नगरपंचायतीने यावर काटोकोर लक्ष ठेवून कडक कारवाई करत दंड आकरण्याची गरज आहे.
सध्या गणेशचतुर्थीच्या सनात मलप्रभा घाटावर स्वच्छतेची गरज आहे.तेव्हा नागरीकानी नियमाचे पालन करत मलप्रभा नदी घाटावर कपडे धुणे,कोणत्या प्रकारचे पुजा सामान,फुले, केळीची पाने व प्लॅस्टीक टाकू नये.अशी नगरपंचायतीकडुन वारंवार सुचना येत आहेत.यासाठी नगरीकानी सहकार्य करने काळाची गरज आहे.